यूटीआय सेन्सेक्स एक्स्चेंज ट्रेडेड फंडाने (यूटीआय सेन्सेक्स ईटीएफ) ३ सप्टेंबरपासून मुंबई शेअर बाजारामध्ये (बीएसई) व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. यूटीआय सेन्सेक्स ईटीएफता पहिला ट्रेिडग दिवस पूर्ण झाल्याबद्दल बीएसई येथे यूटीआय एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी आणि मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम झाला.
यूटीआय सेन्सेक्स ईटीएफच्या एनएफओ २४ व २६ ऑगस्ट दरम्यान होता. या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट, खर्चापूर्वी, संबंधित निर्देशांकाने अधोरेखित केलेल्या उत्पन्नानुसार, सिक्युरिटीजच्या एकूण उत्पन्नाशी साधम्र्य असलेले उत्पन्न पुरवणे, हे आहे. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स इंडेक्सशी संबंधित असलेल्या सिक्युरिटीजमध्ये आणि मनी मार्केट साधनांमध्ये यूटीआय सेन्सेक्स एक्स्चेंज ट्रेडेड फंड गुंतवणूक करणार आहे. यूटीआय म्युच्युअल फंड हा सेबी नोंदणीकृत म्युच्युअल फंड असून त्याचे प्रायोजक स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा व लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आहेत. यूटीआय म्युच्युअल फंड हा भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडांपकी एक असून जून २०१५ पर्यंत १६२ देशांतर्गत योजना व प्लॅनअंतर्गत गुंतवणूकदार खाती ९६.७ लाख होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2015 रोजी प्रकाशित
मुंबई शेअर बाजारात यूटीआय सेन्सेक्स ईटीएफचे व्यवहार
यूटीआय सेन्सेक्स एक्स्चेंज ट्रेडेड फंडाने (यूटीआय सेन्सेक्स ईटीएफ) ३ सप्टेंबरपासून मुंबई शेअर बाजारामध्ये (बीएसई) व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 08-09-2015 at 07:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uti sensex etf transaction in mumbai share market