फंडाविषयक विवरण
फंड प्रकार    :    समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार     :    समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक    :    फंड घराण्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार हा मल्टिकॅप प्रकारचा फंड आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
फंड गंगाजळी    :     फंडाची मालमत्ता १,०२९ कोटी रु. ३०/०६/२०१५ रोजी
व्यवस्थापन    :    योगेश भट्ट हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.
पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती    :    फंड घराण्याच्या  http://www.icicipruamc.co या     संकेतस्थळावरून किंवा पसंतीच्या वितरका कडून किमान पाच हजार एका वेळेस किंवा अथवा किमान एक हजाराच्या एसआयपीने या फंडात गुंतवणूक करता येते. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्याआत बाहेर पडल्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू.
शेअर बाजार ही अशी जागा आहे, की जेथे सतत काही ना काही घडत असते. या घडामोडींवर आधारित आपली गुंतवणूक धोरणे ठरवत त्यानुसार कृती करणारा हा फंड आहे. आíथक जगतातील बदलांना प्रतिसाद देत समभागांची खरेदी विक्री करणे हे या फंडांचे धोरण आहे. म्हणूनच या फंडाची गुंतवणूक कधी कधी मिड कॅप व स्मॉल कॅप या सारख्या जोखीम असलेल्या समभागांमध्ये केंद्रित झालेली असते तर कधी लार्ज कॅप या तुलनेने कमी जोखमीच्या समभागात विखुरलेली असते. मागील तीन वर्षांचा विचार केल्यास गुंतवणुकीचा रोख लार्ज कॅपच्या दिशेने कललेला स्पष्टपणे दिसत आहे. संदर्भ निर्देशांकाने मागील वर्षभरात २.८ टक्के परतावा दिलेला आहे तर शुक्रवार ९ ऑक्टोबरच्या फंडाच्या ग्रोथ एनएव्हीवर आधारित परताव्याचा दर ३.७ टक्के आहे. या फंडाची पहिली एनएव्ही ३१ ऑक्टोबर २००३ रोजी जाहीर झाली. मागील ४५ तिमाहीत फंडाचा परताव्याचा दर हा नेहमीच संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक राहीला आहे. फंडाने चक्रवाढ दराने पाच वर्षांत १०.२३ टक्के परतावा दिला असून याच काळात संदर्भ निर्देशांकाने ५.९ टक्के परतावा दिला आहे. या फंडाचा परताव्याचा दर लार्ज कॅप फंड गटातील रिलायन्स इक्विटी अपॉच्र्युनिटी व एचडीएफसी इक्विटी या प्रमुख स्पर्धक फंडांपेक्षा मागील वर्षभरात अव्वल ठरला आहे. या फंडाचा शार्प रेशो ०.७४ असल्याने कमी जोखीम घेऊन साधारण परतावा मिळविणारा हा फंड आहे. विविध उद्योग क्षेत्रातील सुयोग्य मूल्यांकन असलेल्या कंपन्या निवडून त्यातून त्यात्या परिस्थितीला पोषक अशा कंपन्यांच्या समभागाची निवड करणे हे या फ्गारदारांचे उद्दिष्ट आहे.आगामी काळात बाजारात सतत वेगाने चढ उतार होणार आहेत. अशा परिस्थितीत बाजारात होणारे बदल लक्षात घेऊन त्यानुसार तातडीने धोरणे आखणाऱ्या फंडात गुंतवणूक करणे योग्य ठरणार आहे. गुंतवणुकीचा परतावा नेहमीच निधी व्यवस्थापकाने घेतलेल्या जोखमीच्या प्रमाणात असावा. हे लक्षात घेऊन जोखीम व परताव्याचा दर यांचा विचार केल्यास या फंडात गुंतवणूक करणे हिताचे आहे. बाजारातील बदलांना पोषक मालमत्तेचे विकेंद्रीकरण करून दीर्घकालीन समभाग गुंतवणूक करून संपत्तीची निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाची निवड करावी.
mutualfund.arthvruttant@gmail.com