आशीष ठाकूर

सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी रात्री  २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक सवलतींचा पाऊ स पडला. मनोमन वाटलं आता तरी तेजीचं घोडं पार अटकेपार म्हणजे निफ्टीला १०,००० च्या पल्याड झेपावणारा ठरेल. पण कसलं काय.

सरलेल्या सप्ताहातील निफ्टीचा साप्ताहिक बंद हा अगोदरच्या ८ मेच्या साप्ताहिक बंदच्या ९,२५१ खालीच आला. निफ्टीने तेजीच्या घोडय़ाचं प्यादं एक घर तर मागे घेतलंच, पण तेजीचं घोडं पार खंगलेलं आहे हे दाखवून दिलं. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या –

शुक्रवारचा बंद भाव

सेन्सेक्स : ३१,०९७.७३

निफ्टी : ९,१३६.८५

२० लाख कोटींची क्षेत्रवार विभागणी जोवर पूर्ण होत नाही. तोपर्यंत निर्देशांक सेन्सेक्सवर २९,९०० आणि निफ्टीवर ९,६०० पर्यंत झेपावण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत उपरोक्त स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकत नाही तोपर्यंत शाश्वत तेजीची शक्यता धूसरच आहे.

किंबहुना येणाऱ्या दिवसात निर्देशांक सेन्सेक्सवर ३०,३०० आणि निफ्टीवर ८,९०० च्या खाली सातत्याने टिकल्यास निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर २९,५०० आणि निफ्टीवर ८,६०० असे असेल. त्यानंतरचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर २८,४५० आणि निफ्टीवर ८,३०० असे असेल. या स्तरावर पायाभरणी होऊन निर्देशांकाचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३४,४०० आणि निफ्टीवर १०,००० असेल.

समभाग संच बांधणीचे निकष :

श्वसनाला त्रास, ज्वर अशी जी काही करोनाची लक्षणे आढळतात. त्यावरचा प्राथमिक उपचार म्हणजे पॅरासिटामोल हे आता सर्वोतोमुखी झाले आहे. पण १९७३ पासून अजंठा फार्मा याच औषधाची निर्मिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. या कार्याची दखल म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या आफ्रिका खंडातील हिवताप उच्चाटन मोहिमेत अजंठा फार्माचे भरीव योगदान आहे.

आजच्या मितीला ३० हून अधिक देशात हिवताप, हृदयरोग, अस्थीरोग, मधूमेह, श्वसनविकार या व्याधींवर कंपनीच्या औषधांना भरीव मागणी आहे. औषध कंपनींच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे त्यांच्या औषधांना अमेरिकेच्या औषध प्रशासन अर्थात ‘यूएस एफडीए’ची मान्यता. अजंठा फार्माच्या विविध औषधे अमेरिकेच्या औषध प्रशासनाकडून मान्यताप्राप्त आहेत. जेव्हा करोना बाल्यावस्थेत होता – या रोगावर अजूनतरी औषध नाही – तेव्हा यावर पँरासिटामोलचा वापर प्रभावी ठरू शकतो, हे ध्यानात येताच जवळपास साडेचार दशकाहून अधिक अशी याच क्षेत्रात कार्यरत असलेली भारतीय बनावटीची बहुराष्ट्रीय कंपनी (एमएनसी) गुंतवणूकदारांच्या नजरेस आणून देण ही काळाची गरज होती या दृष्टीकोनातून अजंठा फार्माचा समभाग सुचविण्यात आला.

आगामी तिमाही निकालांचा वेध..

 टाटा पॉवर कंपनी लिमिटेड

तिमाही निकाल – मंगळवार, १९ मे   १५ मेचा बंद भाव – रु. ३१.४०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २७ रुपये.

उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३३ रुपये.

भविष्यात २७ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४८ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

सर्वसाधारण निकाल : २७ ते ३३ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

निराशादायक निकाल : २७ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २४ रुपयांपर्यंत घसरण.

अजंठा फार्मा लिमिटेड

तिमाही निकाल – बुधवार, २० मे   १५ मेचा बंद भाव – रु. १,४९८.८५

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,४०० रुपये.

उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५०० रुपये.

भविष्यात १,४०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,८०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

सर्वसाधारण निकाल : १,४०० ते १,५०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

निराशादायक निकाल : निकालानंतर १,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३०० रुपयांपर्यंत घसरण.

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

तिमाही निकाल – शुक्रवार, २२ मे १५ मेचा बंद भाव – रु. २०.९०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २० रुपये.

उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २३ रुपये.

भविष्यात २० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २८ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

सर्वसाधारण निकाल : २० ते २३ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

निराशादायक निकाल : २० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १७ रुपयांपर्यंत घसरण.

डाबर इंडिया लिमिटेड

तिमाही निकाल – बुधवार, २७ मे १५ मेचा बंद भाव – रु. ४४३.९५

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४३५ रुपये.

उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४३५ रुपयांचा स्तर राखत, प्रथमवरचे लक्ष्य ४७० रुपये.

भविष्यात ४३५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

सर्वसाधारण निकाल : ४३५ ते ४७० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

निराशादायक निकाल : ४३५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४०० रुपयांपर्यंत घसरण.