22nd May Panchang & Marathi Rashi Bhavishya: २२ मे २०२४ ला वैशाख शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होणार आहे. बुधवारच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत चतुर्दशी असेल व त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरु होईल.आज सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र व त्यानंतर विशाखा नक्षत्र जागृत होईल. आजच्या शुभ योगांबद्दल सांगायचे तर दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत वरीयान योग असणार आहे. आजचा दिवस पंचांगानुसार तरी शुभ मानला जात आहे. आपल्या राशीनुरुप आजच्या दिवसात काय फलित प्राप्त होईल हे पाहूया..

२२ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-उगाचच चिडचिड कराल. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील.

वृषभ:-सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. अति श्रमाचा ताण जाणवेल.

मिथुन:-लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. कामात चलबिचलता येईल. गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी.

कर्क:-जवळचा प्रवास चांगला होईल. भावंडांचा सहवास लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवीन विषय आवडीने जाणून घ्याल. आवडता छंद जोपासाल.

सिंह:-गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. तरुण वर्गाशी जवळीक वाढेल. नवीन मित्र जोडाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल.

कन्या:-दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. कमिशन मधून मिळणार्‍या फायद्याचा लाभ उठवा. धार्मिक कामातून मान वाढेल. वरिष्ठांना नाराज करू नका. पोटाची काळजी घ्यावी.

तूळ:-मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. राग अनावर होऊ देऊ नका. पत्नीचे मत मान्य करावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो..

वृश्चिक:-कौटुंबिक शांतता जपावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत. जुनी कामे पूर्ण करता येतील. फार विचार करत बसू नका.

धनू:-कामातील उत्साह वाढवावा लागेल. मनातील शंका बाजूला साराव्यात. कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा. प्रवासात सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मकर:-भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल. बोलताना सारासार विचार करावा. जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका. अकारण होणार्‍या खर्चाकडे लक्ष ठेवा. कामात सहकार्‍यांची साथ मिळेल.

कुंभ:-उगाच त्रागा करू नका. मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल.

हे ही वाचा<< शनी खजिन्याचं कुलूप बुद्ध पौर्णिमेला उघडणार; ‘या’ ४ राशींना मिळणार मोठा वाटा, श्रीमंतीसह ‘हे’ लाभ करतील भरभराट

मीन:-खर्चाचे प्रमाण वाढेल. बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. सामाजिक जाणीव जागृत ठेवावी. जवळचे नातेवाईक भेटतील. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर