Aajche Rashi Bhavishya, 23 June 2025 In Marathi: २३ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी रात्री १० वाजून १० मिनिटांपर्यंत राहील. दुपारी १ वाजून १७ मिनिटांपर्यंत धृति योग जुळून येईल. संध्याकाळी ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत कृतिका नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज मासिक शिवरात्री असणार आहे. सोमवारी प्रदोष शिवरात्री तुमच्या राशीसाठी शुभ ठरणार की अशुभ जाणून घेऊया…
२३ जून २०२५ आजचे राशिभविष्य (Mesh To Meen Rashi Bhavishya In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल. हौस भागवणे शक्य होईल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
कष्टाला मागेपुढे पाहू नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. रेस-जुगारातून नुकसान संभवते. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. किरकोळ दुखापत संभवते.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर