26th April Panchang & Daily Marathi Rashi Bhavishya: २६ एप्रिल २०२४ ला चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. या तिथीला अनुराधा नक्षत्रात वरिघा योग जुळून आला आहे. आजच्या दिवसात ५३ मिनिटांसाठी म्हणजेच सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आज सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे. आजच्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत असणार आहे. आज म्हणजे २६ एप्रिल २०२४ चा दिवस तुमच्या राशिनुरूप तुमच्यासाठी कसा जाणार आहे हे पाहूया..
२६ एप्रिल पंचांग व राशी भविष्य
मेष:-जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सतत खटपट करत राहाल. कामाचा ताण जाणवेल. चिकाटी सोडू नका.
वृषभ:-सर्वांशी गोड बोलणे ठेवाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. बर्याच दिवसांची हौस पूर्ण करून घ्याल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. प्रेमाच्या दृष्टीने उत्तम मैत्री लाभेल.
मिथुन:-मनातील विचित्र कल्पना काढून टाका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रेम प्रकरणाला बहार येईल.वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल.
कर्क:-नातेवाईकांकडून कौतुक केले जाईल. घरातील वातावरण खेळकर राहील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. घरगुती कामे आनंदाने पार पाडाल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणा दिसून येईल.
सिंह:-जवळच्या प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी खटके उडू शकतात. बर्याच दिवसांनी भावंडांची गाठ पडेल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.
कन्या:-कौटुंबिक वातावरणात रमून जाल. आवडीच्या गोष्टी करण्यात भर द्याल. चारचौघांत आपली कला सादर करा. योग्य संधीची वाट पहावी लागेल. कामातील अडथळे दूर होतील.
तूळ:-दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. नातेवाईकांचे प्रश्न जाणून घ्याल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्याल.
वृश्चिक:-जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मानसिक चंचलता जाणवेल. हातातील कामात यश येईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
धनू:-क्षुल्लक वादावादीत अडकू नका. काटकसरीवर भर द्यावा. प्रवासात योग्य सावधानता बाळगावी. हातात नवीन अधिकार येतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
मकर:-काही कामे अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. कामाच्या ठिकाणी चंचलता टाळावी. नातेवाईकांशी सामोपचाराचे धोरण ठेवावे. खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल. नसती काळजी करत बसू नका.
कुंभ:-पित्त विकार बळावू शकतो. इतरांना सहृदयतेने मदत करू शकाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरगुती कामात वेळ घालवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
हे ही वाचा<< लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
मीन:-सामाजिक जाणीवेपोटी काम कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर