Daily Horoscope In Marathi, 9 June 2025 : ९ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांपर्यंत जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे, त्यानंतर चतुर्दशी सुरु होईल. दुपारी १ वाजून ९ मिनिटांपर्यंत शिव योग जुळून येईल. दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत विशाखा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज शिव योग तुमच्या राशीसाठी काय घेऊन आला आहे जाणून घेऊया…
९ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Today Horoscope In Marathi, 9 June 2025)
मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
आध्यात्मिक प्रगती साधता येईल. तुमच्याकडील ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उपासनेत प्रगती कराल. उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करून चालणार नाही. काटकसरीने वागावे लागेल. वैचारिक गोंधळ टाळावा. मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
कामात दिरंगाई जाणवू शकते. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सहकार्यांवर फार विसंबून राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावी लागेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर