Akshaya Tritiya 10th May 2024 Rashi Bhavishya: हिंदू धर्मानुसार अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांमध्ये अक्षय्य तृतीया तिथीचा सुद्धा समावेश आहे. यादिवशी केलेल्या कामाचे प्रभाव हे अक्षय्य म्हणजेच कधीही न संपणारे असतात असे मानले जाते. तसेच यादिवशी झालेला लाभ हा चिरकाल टिकणारा असतो अशीही मान्यता आहे. यंदा शुक्रवार १० मेला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे. विशेष म्हणजे यंदा १०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला तीन अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत. यापैकी एका हा गुरु चंद्राचा गजकेसरी राजयोग, दुसरा हा शनीचा शश राजयोग व तिसरा अत्यंत लाभदायक असा बुध व शुक्राचा लक्ष्मी नारायण राजयोग असणार आहे. याशिवाय अन्य अनेक लहान मोठे योग सुद्धा विविध राशींमध्ये साकारले जाणार आहेत. या योगायोगामुळे अक्षय्य तृतीयेपासून खरोखरच काही राशींचा सुवर्ण काळ सुरु होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मी या राशींच्या घरी नांदेल अशी स्थिती ग्रहांनी साकारली आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला तयार होणारा लक्ष्मी नारायण राजयोग हा १९ मे पर्यंत कायम असणार आहे तर शनीच्या पुढील नक्षत्र परिवर्तनापर्यंत शश योग सुद्धा कायम असेल. अशा स्थितीत हा अंदाज लावता येऊ शकतो की प्रभावित राशी केवळ अक्षय्य तृतीयेलाच नव्हे तर पुढील ९ दिवस प्रचंड धनलाभ मिळवू शकणार आहेत. या राशी कोणत्या व त्यांच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

‘अक्षय्य तृतीया’ ‘या’ राशींसाठी फळणार; सुरु होतील अच्छे दिन

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

अक्षय्य तृतीयेला निर्माण होणारे २ राजयोग म्हणजेच गजकेसरी व लक्ष्मी नारायण हे तुमच्याच राशीत अत्यंत फायदेशीर स्थानी निर्माण होत आहेत त्यामुळे साहजिकच मेष राशीच्या मंडळींना खोऱ्याने पैसे ओढण्याइतके यश लाभू शकते. या मंडळींना नोकरी व्यवसायात प्रचंड प्रगती लाभू शकते. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारल्याने जुनी देणी देऊन मोकळे व्हाल. नवीन घर किंवा गाडीच्या खरेदीसाठी प्रयत्न करता असल्यास उत्तम संधी आहेत. कौटुंबिक आयुष्यात सुखकर होईल.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या मंडळींना अक्षय्य तृतीयेला तयार होणारे राजयोग एखाद्या वरदानाहुन कमी नाहीत. या मंडळींना १० मे पासून आयुष्यात सोनेरी क्षण अनुभवता येतील. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आयुष्य वेचलं त्या गोष्टी पूर्णत्वाला जाताना दिसतील. तुम्हाला विचारांच्या पलीकडे आर्थिक फायदे होऊ शकतात. पदोन्नतीची संधी आहे. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असल्यास भांडवलाची तरतूद होऊ शकते, कामाच्या ठिकणी संयमाची परीक्षा होईल. भावंडांमधील मतभेद दूर होतील. वैवाहिक आयुष्यात नमती बाजू घ्यावी लागेल पण सांभाळून घेतल्यास तुम्हाला या ९ दिवसांमध्ये जोडीदाराचे प्रेम प्राप्त करता येईल.

हे ही वाचा << ‘अक्षय्य तृतीयेला’ लक्ष्मी नारायण योग बनल्याने ‘या’ ३ राशींना चिरकाल धनप्राप्तीची संधी; १९ मे पर्यंत आनंदी आनंद गडे

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

अक्षय्य तृतीयेला मीन राशीच्या मंडळींचा अनुकूल काळ सुरु होणार आहे. दोन्ही राजयोग आपल्याला पद, प्रतिष्ठा व पैसा देऊन जातील. प्रमोशनची वाट पाहणाऱ्यांना लवकरच नामी संधी प्राप्त होईल. यश आपल्या पायाशी येईल. नवकल्पना सुचतील. विचारात गुंतून राहाल. तुमच्या वाणी व लेखणीतून या कालावधीत मोठे लाभ संभवतात. घरी- दारी वादाचे प्रसंग येऊ शकतात, तुम्हाला नेहमीच्या स्वभावापासून वेगळे निर्णय घ्यावे लागू शकतात पण यामुळे तुम्ही जवळच्या मंडळींचा विश्वास संपादित कराल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)