Daily Horoscope Today, 17 June 2025 : १७ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी दुपारी २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील. बुधवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत प्रीती योग जुळून येईल. रात्री १ पर्यंत १४ मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ ३:०० वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. आजच्या दिवशी राशीचक्रातील १२ राशींच्या कुंडलीत नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया…

१७ जून २०२५ राशिभविष्य ( Horoscope 17 June 2025, Read Predictions For Zodiac Signs)

मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल. नोकरदारांची जबाबदारी वाढेल. आर्थिक मान सुधारेल. मानसिक अस्वस्थता वाढवू नका.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

हाती घेतलेल्या कामात पूर्तता येईल. कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

फसवणुकीपासून सावध राहावे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. मनातील निराशा दूर सारावी.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेताना कठीण होईल. काही महत्त्वाची कामे पार पडतील. व्यवहारात फार हटवादीपणा करू नका. क्रोधामुळे वाद वाढू शकतात. दिवसभरात चांगली आर्थिक कमाई होईल.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. जवळच्या ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक शांतता जपावी.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

प्रत्येक कृती संयमाने करावी. मानसिक चिंता दूर साराव्यात. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. प्रवास जपून करावा.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

जवळच्या मित्रांशी भेट होईल. कामे मनाजोगी पार पडतील. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. प्रेमप्रकरणात नवीन आशा पल्लवीत होईल. अचानक धनलाभाची शक्यता

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. जवळच्या ठिकाणी सहलीचा आनंद घ्याल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमा कराल.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. शारीरिक कंटाळा झटकून टाकावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर