Ashta Lakshmi Raj Yoga 2023: नवग्रहांपैकी सर्व ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलून राशी परिवर्तन करतात, याच मार्गक्रमणाला ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर असे म्हणतात. कोणत्याही ग्रहाने गोचर केल्यास त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र काही महत्त्वाचे ग्रह जसे की, मंगळ, शुक्र आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे कर्मदाता शनि जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रत्येक ग्रहाच्या मार्गक्रमणानंतर कुंडलींवर शुभ- अशुभ प्रभाव सुरु होतो. डिसेंबर महिन्यात अनेक ग्रह गोचर करणार आहेत तर काहींच्या कुंडलीत पूर्वीच गोचर झालेल्या ग्रहांच्या प्रभावाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.

मागील महिन्यात १३ नोव्हेंबरला शुक्र ग्रहाने वृश्चिक राशीत गोचर करून अष्टलक्ष्मी राजयोग तयार केला होता. याचा दुसऱ्या टप्प्यातील प्रभाव ३ राशींवर अत्यंत शुभ ठरणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शुक्र गोचराने साधलेल्या अष्टलक्ष्मी राज्योगाने तीन राशींना अमाप धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे पाहुयात …

अष्टलक्ष्मी राजयोगाने ‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ

मीन

अष्टलक्ष्मी राजयोग्य बनल्याने मीन राशीच्या मंडळींना अत्यंत शुभ प्रभाव लाभू शकतो. ज्योतिषांच्या माहितीनुसार या मंडळींना मीन राशीच्या व्यक्तीची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात केलेल्या कामात यश मिळू शकते. तुमच्या सुखसोयींमध्येही वाढ होऊ शकते. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थैर्य व प्रगती लाभू शकते.

मकर

मकर राशीच्या ११ व्या प्रभाव कक्षेत अष्टलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या काळात गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आहे. तुमच्या मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे परिणामी आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीचा आपल्यास फायदा होऊ शकतो. या काळात नवीन वाहन व घर खरेदी करण्याची संधी आल्यास नक्कीच विचारात घेऊ शकता.

हे ही वाचा<< १ जानेवारी पासून गुरु ‘या’ ३ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी; ६ महिने अमाप पैसे कमावू शकतील ‘ही’ मंडळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी अष्टलक्ष्मी योग अनुकूल ठरू शकतो. कारण शुक्राचे संक्रमण होऊन तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात हा राजयोग तयार होणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. उधार दिलेले पैसे न मागता परत मिळू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहीतके यांच्या आधारे देण्यात आला आहे)