Aajche Rashibhavishya in Marathi 01 June 2025: आज ०१ जुलै २०२५ रोजी आषाढ कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून सोमवार आहे. दशमी तिथी आज सकाळी १० वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. आज दुपारी ०१ वाजून ४२ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग असेल. याशिवाय, भरणी नक्षत्र उद्या सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत संपूर्ण दिवस आणि रात्र चालू राहील. याशिवाय, उद्या संध्याकाळी ०४ वाजून १० मिनिटापर्यंत नेपच्यून मीन राशीत वक्री होईल. राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर जुलैच्या या पहिल्याच दिवशी १२ राशींचा दिवस नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊ या…
०१ जुलै २०२५ आजचे राशिभविष्य (Today Horoscope in Marathi, 01 July 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
मानसिक अस्वस्थता काही प्रमाणात जाणवेल. क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका. सामुदायिक बाबींचे भान राखावे. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. मनात नसत्या चिंतांना थारा देऊ नका.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्थावरच्या व्यवहारात अधिक लक्ष घालावे लागेल. जवळच्या मित्रांची नाराजी दूर करावी.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
कामाची धांदल उडेल. योग्य व नियोजनबद्ध कामे आखावीत. आपले विचार अधिक स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करावा. गप्पांमध्ये अधिक वेळ घालवू नका. मानसिक चंचलतेला आवर घालावी.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
वैचारिक शांतता जपावी. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल. मौजमजा करण्याकडे अधिक कल राहील. कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाचच कोणाचाही रोष ओढावून घेऊ नका.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वातविकाराचा त्रास संभवतो. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. अति काळजी करणे योग्य नाही. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे लागेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. ओळखीच्या लोकांशी वादात अडकू नका. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. नातेवाईकांचे विचार जाणून घ्यावेत.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पित्त विकाराचा त्रास संभवतो. नवीन गुंतवणूक करताना सारासार विचार करावा. सहकार्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
तुमची चिडचिड वाढू शकते. आज वेळ चुकवून चालणार नाही. न आवडणार्या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल. स्वभावातील तामसी वृत्तीत वाढ होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
कौटुंबिक बाबी जुळवून घ्याव्या लागतील. समोरील प्रश्न शांततेने सोडवावे लागतील. घरातील वातावरण तप्त राहील. योग्य वेळेसाठी थांबावे लागेल. प्राथमिक स्वरुपात पुढील गोष्टींचे अंदाज बांधावेत.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
मुलांच्या बाबत आपण समाधानी राहाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रवासात फार घाई उपयोगाची नाही. आपले मत शांततेने मांडावे. आनंदी दृष्टीकोन बाळगावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बोलण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तामसी पदार्थ खाल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
चुकीच्या कामांमध्ये हात घालू नका. भडक विचार नोंदवू नका. छंद जोपासण्यात वेळ घालवावा. हातातील कलेला वाव द्यावा. नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर