Vivah Rekha in Hand: हस्तरेखा शास्त्रानुसार आयुष्यातील विविध पैलूंचा अभ्यास करता येतो तसेच काही प्रमाणात भविष्याविषयी सुद्धा काही महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवता येतात. आपल्या सगळ्यांच्याच हातावर विविध रेषा असतात. व्यक्तीचे आयुष्यमान किती असेल? शिक्षण, नोकरी, प्रगतीची चिन्हे नशिबात कधी आहेत? आर्थिक स्थिती कशी असणार? व्यक्तिमत्व कधी व कसे उजळत जाणार? वैवाहिक आयुष्य व जोडीदार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वजा अंदाज हे या रेषांमध्ये दडलेले असतात असं म्हटलं जातं. आजच्या या लेखात आपण विवाह रेषा कुठे असते व त्यातून नेमके काय संकेत मिळतात याविषयी जाणून घेणार आहोत .

तुमच्या हातावर विवाह रेखा कुठे असते?

विवाह रेषा ही खूपच लहान व पुसट असल्याने अगदी बारकाईने पाहिल्यावर ती दिसून येते. करंगळीच्या अगदी खाली हाताच्या बाहेरच्या दिशेने आत येत असणारी अशी हे रेष असते ज्याला विवाह रेखा असे म्हटले जाते. अनेकांच्या तळहातावर एकाहून अधिक रेषा सुद्धा असतात. विवाह रेषेवरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात जोडीदाराचे प्रेम व वैवाहिक स्थिती कशी असणार याचा अंदाज वर्तवता येतो. याशिवाय लग्नाचे वय किती असेल, जोडीदाराचा स्वभाव कसा असेल, आर्थिक स्थिती कशी असेल व सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात कोणते फायदे- तोटे वजा बदल दिसून येऊ शकतील हे जाणून घेता येते.

‘अशी’ रेषा असल्यास मिळतो श्रीमंत जोडीदार

हस्तरेखा अभ्यासक सांगतात की विवाह रेषा जर स्पष्ट असेल आणि चंद्र पर्वतावरून कोणतीही रेष जर विवाह रेषेला येऊन मिळत असेल तर अशा मंडळींना राजघराण्यात विवाहाचे योग असतात. सधन घरात त्यांचे लग्न होऊ शकते. चंद्र पर्वतावरून येणारी रेष विवाह रेषेजवळ असल्याने यांच्या भाग्यात भरपूर प्रेम असते. वैवाहिक आयुष्यात अगदी हसत खेळत आनंदी क्षण जगता येतात. या रेषेजवळ काहीसा गुलाबी लालसर रंग असल्यास अशा मंडळींना अत्यंत रोमँटिक जोडीदार लाभू शकतो. तर पिवळसर छटा असल्यास यांचे वैवाहिक आयुष्यात थोडे उदास असू शकते.

हे ही वाचा<< ६ दिवसांनी आदित्य मंगल राजयोग बनल्याने ‘या’ राशीचे लोक होतील मालदार; २०२४ मध्ये लक्ष्मीकृपेने जीवन होईल गोड

दोन लग्न होण्याची शक्यता कधी?

जर एखाद्याची विवाह रेषा बारीक व अस्पष्ट असेल तर अशी मंडळी आपल्या जोडीदाराला पूर्णपणे समर्पण करण्यास कधीच तयार होत नाहीत. अनेकदा नाती तुटून नव्याने बनतात किंवा त्यांना एकटेपणा सुद्धा सहन करावा लागतो. स्वतःवरील व इतरांच्या बाबतचा अविश्वास त्यांना विवाहबाह्य संबंध ठेवण्यासही उद्युक्त करू शकतो. जर तळहातावर एकाहून अधिक विवाह रेष असेल तर दोन लग्न होण्याची पुसटशी शक्यता असते. तर एक स्पष्ट विवाह रेष व अन्य अस्पष्ट विवाह रेष ही लग्न व विवाहबाह्य संबंधाचे संकेत देत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)