Grhan Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, ग्रह एका विशिष्ट काळात राशी बदल करून शुभ आणि अशुभ योग तयार करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या जीवनावर दिसून येतो. ३० जून रोजी केतू आणि चंद्र युतीने ग्रहण योग तयार होणार आहे. हा योग सिंह राशीत तयार होईल. यामुळे १२ पैकी ३ राशीच्या लोकांना खूप काळजी घेण्याची गरज असेल. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायातही अनेक अडचणी येऊ शकतात. पण, नेमक्या कोणत्या राशींच्या जीवनात अडचणी येतील जाणून घेऊ…
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग नकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. तुम्हाला मानसिक ताणदेखील येऊ शकतो. तुमचे काही काम मध्येच थांबू शकते. तुमच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून एखाद्याचा गैरसमजदेखील होऊ शकतो, ज्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. जुना आजार पुन्हा बळावू शकतो, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी केतू आणि चंद्राचे ग्रहण हानिकारक ठरू शकते. या काळात तुम्हाला थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यावेळी तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. तसेच, यावेळी प्रवास करताना थोडी सावधगिरी बाळगा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुमची निराशा होऊ शकते. तसेच, यावेळी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी केतू आणि चंद्राचे ग्रहण हानिकारक ठरू शकते. यावेळी तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. व्यावसायिकांच्या उत्पन्नात थोडी घट होईल. अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. यावेळी कामाच्या ठिकाणी किंवा घरी कोणाशीही वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घेण्याची फार गरज असेल.