ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व आहे. युती म्हणजेच एकाच राशीत दोन किंवा अधिक ग्रह एकत्र येतात, अशा स्थितीला ग्रहांचा संयोग म्हणतात. प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा स्वभाव असतो, त्यानुसार मनुष्य जीवनावर प्रभाव टाकत असतो. एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत एकत्र आल्याने परिणाम दिसून येतो. म्हणजेच कधी कधी शुभ ग्रह देखील अशुभ परिणाम देऊ लागतो किंवा अशुभ ग्रह शुभ ग्रहासोबत राहिल्याने व्यक्तीला शुभ फलही देऊ शकतो. एप्रिल महिन्यात मीन राशीत शुक्र आणि गुरू या दोन प्रमुख ग्रहांचा संयोग होणार आहे. ज्योतिष शास्त्रात दोन्ही ग्रह खूप महत्वाचे मानले जातात. अशा स्थितीत मीन राशीतील या दोन ग्रहांची युती अनेक अर्थाने विशेष ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मीन रास ही गुरु ग्रहाची स्व-रास आहे.
१२ वर्षांनी गुरु ग्रह स्वतःच्या राशीत आले आहेत. गुरु ग्रह १३ एप्रिल २०२२ रोजी मीन राशीत विराजमान झाले आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत गुरु ग्रह मीन राशीत असतील. दुसरीकडे, शुक्र ग्रह देखील २७ एप्रिल २०२२ रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीत दोन ग्रहांची युती होईल.
शुक्र-गुरु युतीचा तुमच्या राशींवर काय परिणाम होईल?
- मेष: वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या संपण्याची शक्यता आहे, तसेच नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
- वृषभ: लोकांच्या आर्थिक समस्या संपतील, लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला दीर्घकाळ लाभ मिळतील.
- मिथुन: ग्रहांच्या संयोगामुळे आर्थिक स्थिती अनुकूल राहील. तब्येत उत्तम राहण्याची शक्यता आहे.
- कर्क : संयोगानंतर कर्क राशीच्या लोकांना सुख-संपत्ती आणि वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे.
- सिंह: संक्रमण काळात व्यावसायिक जीवनात काही बदल दिसून येतील.
- कन्या : संक्रमण काळात शुभ कार्याचे योग मजबूत होतील. लग्नासाठी स्थळं येतील आणि अनेकांची लग्नही ठरतील.
- तूळ : खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे या काळात अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा.
- वृश्चिक: जीवनात होणारे चढ-उतार स्थिर राहतील, समाजात कीर्ती आणि सन्मान वाढेल, कामाचे कौतुक होईल.
- धनु: प्रवासाचे योग असून लाभही मिळेल. याशिवाय गुरू-शुक्र यांचा संयोगामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल.
- मकर : आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून आर्थिक समस्या संपतील.
- कुंभ: गुरू आणि शुक्र यांच्या युतीमुळे प्रेमसंबंधांमध्ये शुभ परिणाम मिळतील. लोकांच्या ज्ञानात आणि तर्कशक्तीमध्ये मोठी वाढ होईल.
- मीन: १२ वर्षांनंतर गुरूचे स्वतःच्या राशीत होणारे संक्रमण मीन राशीच्या लोकांचे भाग्य वाढवणारे सिद्ध होईल. याशिवाय लोकांच्या आत्मविश्वासातही वाढ होईल.