Guru Gochar 2025 Mithun Rashi : वैदिक ज्योतिषशास्त्रात, गुरू ग्रहाला समृद्धी, ज्ञान, संपत्ती, गुरू व अध्यात्माचा कारक मानले जाते. दरम्यान, गुरू ग्रह सुमारे १२ वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. सध्या गुरू वृषभ राशीत भ्रमण करीत आहे; पण १४ मे रोजी तो मिथुन राशीत प्रवेश करील, ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींच्या लोकांना पद, प्रतिष्ठा व सन्मान मिळू शकतो. त्यांची करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. पण, नेमका कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊ…
गुरूचा मिथुन राशीतील प्रवेश ‘या’ राशींना करेल धनवान (Guru Gochar 2025 Mithun Rashi)
तुळ (Libra)
गुरूचे मिथुन राशीतील गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांत सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या करता येईल, तसेच कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळू शकेल. या काळात तुम्हाला देश- परदेशांत प्रवासाची संधी मिळू शकेल.
मीन (Pisces)
गुरू गोचर मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात मीन राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकेल. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकेल. तुमचे आईबरोबर असलेले नाते अधिक चांगले होईल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद मिटू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते.
कन्या (Virgo)
गुरू ग्रहाचे गोचर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुख घेऊन येऊ शकते. या काळात कन्या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुमच्या चांगल्या कामामुळे भरघोस नफा होऊ शकतो. प्रेमसंबंधित बाबींमध्ये तुमचा रस वाढेल. घरात सुख आणि शांती राहू शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.