Guru Gochar 2025: देवांचा गुरू ग्रह नऊ ग्रहांमध्ये खूप खास मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रात, गुरूला ज्ञान, बुद्धी, भाग्य, संपत्ती, विवाह व धर्म यांचा कारक ग्रह मानले जाते. यामुळे गुरूच्या स्थानातील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. गुरू ग्रह एका वर्षाने राशिबदल करतो. या ग्रहाला एक राशिचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे १२ वर्षांचा काळ लागतो,ज्यामुळे प्रत्येक राशीवर गुरू ग्रहाचा प्रभाव बराच काळ राहतो.

गुरू सध्या वृषभ राशीत स्थित आहे; पण १४ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी तो मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीतील गुरूच्या प्रवेशाने १२ पैकी तीन राशींचे नशीब पालटणार आहे, त्यांना नोकरीसह वैयक्तिक आयुष्यात सुख, समाधान अनुभवता येणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्याविषयी जाणून घेऊ…

गुरूच्या राशिबदलाने ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल (Guru Gochar 2025 In Mithun Rashi)

वृषभ (Taurus Astrology)

गुरूचा मिथुन राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरू शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांना खूप आर्थिक फायदे मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद कायम राहू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेत लाभ मिळू शकतो. जर तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय असेल तर त्यातूनही तुम्हाला बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असू शकतो. तुम्ही धार्मिक बाबींमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर सुसंवादाने राहाल. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान अधिक मजबूत होईल. यासह अपयशाचा काळ संपेल.

सिंह (Leo Astrology)

गुरूचा मिथुन राशीतील प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकेल. आर्थिक बाबींमध्ये दीर्घकाळापासून जाणवणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकतात. तसेच तुमचे उत्पन्नही वाढू शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलांच्या प्रगती आणि उच्च शिक्षणासाठी तुमचे सहकार्य लाभेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या भावा-बहिणींबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. शारीरिक आणि मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनू (Sagittarius Astrology)

गुरूचा वृषभ राशीतील प्रवेश धनू राशीच्या लोकांसाठी आनंदाचे दिवस घेऊ येऊ शकतो. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. आणि तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. त्यासह व्यवसायात नफ्याच्या अनेक शक्यता निर्माण होत आहेत. तुम्हाला नोकरीत भरपूर यश मिळू शकते. तुमच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यासह तुमची निर्णय घेण्याची क्षमताही मजबूत होईल. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असू शकतो. सासरच्या लोकांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आयुष्यात कायम आनंद राहील.