scorecardresearch

Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेला ग्रहांची विशेष जुळवाजुळव, या ३ राशींचं भाग्य उजळू शकतं

या दिवशी सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह मिथुन राशीमध्ये एकत्र असतील. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण ३ राशी आहेत ज्यांना या योगातून चांगला पैसा मिळू शकतो.

budh-rashi-parivartan-2-1 (1)

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक आपल्या गुरूंची पूजा करतात. तसेच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. यंदा गुरुपौर्णिमा १३ जुलै बुधवारी साजरी होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी ग्रहांचा विशेष युतीही तयार होत आहे. यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तीन प्रमुख ग्रह एका राशीत बसून त्रिग्रही योग तयार करतात. या दिवशी सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह मिथुन राशीमध्ये एकत्र असतील. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण ३ राशी आहेत ज्यांना या योगातून चांगला पैसा मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मिथुन: तुमच्या राशीवरून लग्न भावमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळू शकते. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जे अनावश्यक खर्च केले जात होते त्यावर अंकुश ठेवता येईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. या काळात तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. तसेच भागीदारीच्या कामात चांगले यश मिळू शकते.

आणखी वाचा : Vinayak Chaturthi 2022: यंदा विनायक चतुर्थीच्या दिवशी बनतोय खास योग, अशा प्रकारे गणपतीला प्रसन्न करा

धनु: तुमच्या गोचर कुंडलीतून सातव्या भावात त्रिग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती किंवा वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता.

आणखी वाचा : राहू-मंगळ युती: ‘या’ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या! अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात

वृषभ : तुमच्या राशीतून द्वितीय भावात त्रिग्रही योग तयार होत आहे. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच दिलेले पैसे परत मिळू शकतात. पैशाचे नवीन स्रोत मिळू शकतात. समाजातही तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guru purnima 2022 trigrahi yog in mithun rashi wich zodiac signs get more benefits according to astrology prp

ताज्या बातम्या