Guru-Shukra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुख आणि आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. तर गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. नुकताच गुरूने वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे पुढील एक वर्षापर्यंत गुरूची कोणत्याना कोणत्यातरी ग्रहाबरोबर युती निर्माण होईल.
पंचांगानुसार, ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी देवगुरूने शुक्र ग्रहाबरोबर संयोग करून दशांक योग निर्माण केला. या योगाच्या निर्माण होण्याने काही राशीच्या व्यक्तींना सुख-संपत्ती आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येईल.
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी गुरू-शुक्राचा दशांक योग खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी गुरू-शुक्राचा दशांक योग अनुकूल सिद्ध होईल. हा या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.
कन्या (Kanya Rashi)
गुरू-शुक्राचा दशांक योग हा तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)