falgun purnima 2024 : ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. यंदा फाल्गुन पौर्णिमा २४ मार्चला आहे. या वर्षी फाल्गुन पौर्णिमेला वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी सिद्धी योग सह रवि योग सुद्धा निर्माण होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अनेक शुभ योग निर्माण होत आहे. ग्रहांची स्थिती अनेक राशींसाठी शुभ मानली जात आहे. या दिवशी केतू आणि चंद्र मीन राशीमध्ये विराजमान राहील. तर सूर्य, बुध आणि राहू हे सुद्धा मीन राशीमध्ये विराजमान राहतील. गुरू मेष राशीमध्ये राहणार आहे आणि कुंभ राशीमध्ये मंगळ, शुक्र आणि शनि विराजमान राहील. अशात काही राशींसाठी ही फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी शुभ ठरणार आहे.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमा मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यांना शुभ फळ मिळू शकतात. यांच्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद दिसून येईल. धनसंपत्तीत वाढ होईल. यांचे नशीब उजळू शकते ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. जे काम खूप दिवसांपासून थांबलेले आहे, ते मार्गी लागतील. आर्थिक वृद्धी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. जर या काळात हे लोकं गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर उत्तम आहे. त्यांना फायदा होऊ शकतो. कुटूंबाबरोबर चांगले संबंध राहतील. आर्थिक समस्या दूर होतील.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

हेही वाचा : ‘या’ राशींच्या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही? वैवाहिक आयुष्यात येतात अडचणी

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी फाल्गुन पौर्णिमा शुभ ठरणार आहे. चंद्रग्रहण दरम्यान चंद्र या राशीमध्ये विराजमान राहतील. अशात या राशीच्या लोकांच्या वाटेल सुख समृद्धी येईल. घर कुटूंबात आनंद दिसून येईल. जून्या मित्रमैत्रीणींबरोबर भेट होईल. धनलाभाचे योग जुळून येईल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी उत्तम राहील. ग्रहांचा प्रभाव या राशींवर दिसून येईल. या दरम्यान या राशींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटूंबाबरोबर वेळ देता येईल. व्यवसायात यश मिळू शकते. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर परतफेड करता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर गुंतवणूक करायचा विचार करत असेल कर या राशीला फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)