Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope 3 June 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ३ जून २०२५:

 

 

16:15 (IST) 3 Jun 2025

Shukra Mahadasha: शुक्राच्या महादशेमुळे ‘या’ राशींचे भाग्य चमकणार! राजासारखे जीवन जगतात हे लोक; धन, वैभव अन् उच्च पद मिळणार, २० वर्ष राहतो प्रभाव

Shukra Mahadasha: ज्योतिष शास्त्रामध्ये नवग्रहांसंबधी १२० वर्षांच्या महादशाचे वर्णन केले आहे. म्हणजे ही दशा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुरु असते ज्यामध्ये सूर्य (६ वर्ष), चंद्रमा (१० वर्ष), मंगल ( ७ वर्ष), बुध ( १७ वर्ष), गुरु (१६ वर्ष), शुक्र (२० वर्ष), शनि (१९ वर्ष), राहू (१८ वर्ष) आणि केतु ( ७ वर्ष) आहे. धन आणि वैभवाचा दाता शुक्र ग्रहाच्या महादशेबाबत जाणून घेऊ या, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर वीस वर्ष राहतो. शुक्र ग्रह भौतिक सुख, वैवाहिक सुख, भोग-विलास, प्रसिद्धी, कला, प्रतिभा, सौंदर्य, रोमान्स, काम-वासनेचा कारक मानला जातो. तसेच शुक्र ग्रह तूळ आणि वृषभ राशींचा स्वामी ग्रह आहे. शनी आणि मंगळ ग्रहाबरोबर त्याची मैत्री आहे. सविस्तर वाचा

16:15 (IST) 3 Jun 2025

५० वर्षांनंतर गंगा दशहराच्या मुहूर्तावर ४ दुर्मीळ योग, 'या' तीन राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार, मिळणार बक्कळ पैसा, प्रसिद्धी अन् यश

Ganga Dussehra Siddhi Ravi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गंगा दशहराच्या दिवशी सकाळी सिद्धी योग जागृत असेल. यासह रवि योग आणि हस्त नक्षत्रदेखील असेल. यानंतर, तैतील करण दुपारी १ वाजून ०२ मिनिटांपर्यंत राहील. ...सविस्तर बातमी
15:33 (IST) 3 Jun 2025

३ दिवसांनतर शुक्र निर्माण करणार ‘हा’ शक्तिशाली राजयोग! वृषभसह या २ राशींचे नशीब चकणार, अचानक धनलाभाचा योग

शुक्र आणि मंगळ मिळून धन शक्ती राजयोग निर्माण करत आहेत. या राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ राशीच्या जीवनात कोणता ना कोणता प्रभाव अवश्य पहायला मिळेल. मंगल-शुक्रच्या धन शक्ति राजयोगमुळे काही राशींना भरघोस लाभ होईल. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊ या…सविस्तर वाचा

15:13 (IST) 3 Jun 2025

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)

जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

14:47 (IST) 3 Jun 2025

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)

आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व  पट‍वून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील.

14:35 (IST) 3 Jun 2025

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)

कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.

13:56 (IST) 3 Jun 2025

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)

मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागिदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल.

13:50 (IST) 3 Jun 2025

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)

दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील.

12:57 (IST) 3 Jun 2025

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. चटपटीत पदार्थ खाल.

12:08 (IST) 3 Jun 2025

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)

जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील.

11:44 (IST) 3 Jun 2025

गुरु आदित्य राजयोगामुळे 'या' राशींचे भाग्य चमकते! मिळते अपार धन आणि पद-प्रतिष्ठा, गुरू अन् सूर्याच्या कृपेने पूर्ण होतात सर्व काम

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरू आदित्य राजयोगामुळे गुरू आणि सूर्याची युती निर्माण होते. तसेच कुंडलीमध्ये या राजयोगामुळे व्यक्ती अत्यंत धनवान होतो. ...अधिक वाचा
11:20 (IST) 3 Jun 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)

खेळीमेळीत दिवस जाईल. घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्‍यांना कामात मदत कराल.

10:28 (IST) 3 Jun 2025

मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope)

दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

09:55 (IST) 3 Jun 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope )

जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल.

09:40 (IST) 3 Jun 2025

जूनमध्ये सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र निर्माण करणार तीन राजयोग; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींना पैसा, प्रेम अन् प्रमोशन मिळणार

Malavya RajYog: ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप महत्वपूर्ण मानले जाते. प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळेनंतर राशी परिवर्तन करतो, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार जूनमध्येही काही ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ४ ते २९ जूनपर्यंत सूर्य, बुध आणि शुक्र आणि मंगळ हे ग्रह राशी परिवर्तन करतील. त्यामुळे या महिन्यात बुध, गुरू आणि सूर्यामुळे त्रिग्रही योग निर्माण होईल. तसेच सूर्य-बुधाच्या युतीमुळे बुधादित्य आणि शुक्र-बुधामुळे मालव्य आणि भद्र राजयोग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव १२ राशीपैकी काही राशीच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. सविस्तर वाचा

09:23 (IST) 3 Jun 2025

पैसाच पैसा! ३ दिवसानंतर निर्माण होईल भद्र राजयोग! या राशींचे नशीब पलटणार

Bhadra Rajyog In Mithun 2025 : बुध स्वतःच्या राशीत, मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. ...सविस्तर बातमी
09:04 (IST) 3 Jun 2025

मेष राशिभविष्य (Aries Horoscope )

व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.

08:28 (IST) 3 Jun 2025

Horoscope Today: बुध मार्गी होऊन तुम्हाला करणार का गडगंज श्रीमंत? तुम्हाला कोणत्या प्रकारे होणार प्रचंड धनलाभ? वाचा राशिभविष्य

Daily Horoscope For Each Zodiac Sign On 3 June 2025 : ३ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत हर्षण योग जुळून येईल. रात्री १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत पूर्व फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज सकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी बुध ग्रह मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर तुमच्या राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार की अशुभ जाणून घेऊया…