1 December Astrological Predictions For Zodiac Signs : आज १ डिसेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. या अमावास्येला कार्तिक अमावस्या देखील म्हंटले जाते. आज अनुराधा नक्षत्र २ वाजून २३ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच सुकर्मा योग ४ वाजून ३२ मिनिटनपर्यंत जुळून येणार आहे. तसेच रविवारी राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असेल. तर आजचा दिवस मेष ते मीनसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

१ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल.

budh guru pratiyuti 2024
Budh Guru Pratiyuti Yog 2024 : ५ डिसेंबरपासून ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा! बुध-गुरु संयोग अन् प्रतियुती योगाने दारी नांदणार लक्ष्मी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
4 December zodiac signs daily horoscope
४ डिसेंबर पंचांग: आज वृषभला भागीदारीतून लाभ तर कुंभला जोडीदार देणारा मोलाचा सल्ला; वाचा बुधवारी तुमचं नशीब तुम्हाला कसं साथ देणार?
Shani Mahadasha
शनिच्या महादशामध्ये ‘या’ चार राशींना मिळणार अपार धनलाभ अन् पैसा, नोकरी-व्यवसायात चमकणार नशीब
5 December Vinayak Chaturthi astrological predictions for zodiac signs
५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मेषसह ‘या’ ३ राशींवर लक्ष्मीकृपा; आज गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार का? वाचा राशिभविष्य

वृषभ:- आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

मिथुन:- आपल्या मनाचा आवाज ओळखावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क:- मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सिंह:- व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस.

कन्या:- आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

तूळ:- तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

वृश्चिक:- घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू:- तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

मकर:- गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल.

कुंभ:- जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.

मीन:- परदेशी कंपनीकडून बोलावणे येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा. मानसिक व्यग्रता जाणवेल. उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader