Mangal Chandra Yuti Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांमध्ये मंगळ आणि चंद्राला विशेष महत्त्व आहे. मंगळ दर ४५ दिवसांनी आपली राशी बदलत असतो, तर चंद्र सर्वांत जलदगतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. चंद्र कोणत्याही राशीत अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र देवाचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ३० मे २०२५ रोजी दुपारी ३:४२ वाजता चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क राशीत आधीपासून मंगळ विराजमान असल्यामुळे दोन्ही ग्रहांची कर्क राशीत युती होणार आहे. याच मंगळ-चंद्र युतीचा काही राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर फायदा होऊ शकेल, असे सांगितले जाते. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया…
चंद्र-मंगळ युती; ‘या’ राशींच्या व्यक्तींना होणार अनपेक्षित धनलाभ!
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ-चंद्राच्या संयोगाचा मेष राशीच्या लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो. प्रलंबित कामे आटोक्यात येऊ शकतात. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. रिअल इस्टेट आणि एजंटसाठी हा चांगला काळ असू शकतो.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ-चंद्राच्या युतीने कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. उद्योजक म्हणून यशस्वी होऊ शकाल. तसेच पैशांची बचत करू शकाल. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकेल. शेअर बाजार, लॉटरीत नफा मिळण्याची शक्यता आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचे तुम्हाला लाभ मिळू शकतात. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.
तूळ
मंगळ आणि चंद्राच्या युतीचा तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात भरभराट होऊ शकतो. या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरीत मोठी संधी मिळू शकते. तसेच या काळात सुख-सोयी आणि सुविधा वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
वृश्चिक
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ-चंद्राच्या युतीमुळे वृश्चिक राशीच्या मंडळींना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. जमिनीशी संबंधित कामातून पैसे मिळू शकतात. सुख आणि समृद्धीचे साधन वाढू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)