Mangal Ketu Angarak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्रबदल करीत असतात आणि त्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. त्यांचा परिणाम अनेक राशींच्या लोकांवर दिसून येतो. त्यात २८ जुलै रोजी सिंह राशीत अंगारक योग तयार होणार आहे. सिंह राशीतील मंगळ आणि केतू यांच्या युतीमुळे हा योग तयार होईल. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच त्यांचे आरोग्य बिघडण्याचीही शक्यता आहे. पण नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांसाठी अंगारक योग धोकादायक ठरू शकतो ते जाणून घेऊ….
सिंह
अंगारक योग सिंह राशीत तयार होणार आहे आणि याच राशीच्या लोकांसाठी तो हानिकारकही ठरू शकतो. या काळात तुमचा स्वभाव आक्रमक होऊ शकतो. त्यामुळे कोणावरही रागावणे, चिडचिड करणे टाळा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका, नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. या काळात तुमच्या जोडीदाराबरोबर तणावपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे जर तुम्हाला या काळात पार्टनरशिपमध्ये काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर थांबा, नवीन गुंतवणूक टाळा.
वृश्चिक
अंगारक योगाची निर्मिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते. या काळात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. संयमाने काम केल्यास त्याचे फायदे मिळू शकतात; अन्यथा वाद तुमच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकतो. तसेच, यावेळी नोकरी करणाऱ्यांनी नोकरी बदलली नाही तर बरे होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. गर्भवती महिलांनी विशेषतः काळजी घेणे आवश्यक आहे.
मकर
अंगारक योग मकर राशीसाठी हानिकारक ठरू शकतो. या काळात कोणताही जुना आजार उद्भवू शकतो. तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. इतकेच नाही, तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्याही येऊ शकतात. विशेषतः जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर. यावेळी एखाद्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्याच वेळी जोडीदाराशी मतभेदही होऊ शकतात.