Mangal Transit in Mithun: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह जवळपास १८ महिन्यांत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. एका राशीत मंगळ जवळपास ४५ दिवस उपस्थित असतो. तसेच संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी मंगळ ग्रहाला दीड वर्षाचा कालावधी लागतो. सध्या मंगळ वृषभ राशीत विराजमान असून, या राशीत मंगळ आणि गुरूची युती निर्माण झाली आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मंगळ वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. मंगळ देणार पैसा आणि सुख मेष मंगळ ग्रहाचा मिथुन राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरमध्ये पदोन्नती मिळेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. सुख-समृद्धीत वाढ होईल. कुटुंबीयांसह पिकनिकला जायचा प्लान कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आरोग्य उत्तम राहील. नवी जमीन किंवा मालमत्ता खरेदी कराल. तूळ मंगळ ग्रहाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने तूळ राशीधारकांच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. भौतिक सुखात वाढ होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. नात्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. हेही वाचा: भद्र राजयोग देणार भरपूर पैसा; बुध ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद मीन मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींनाही अनेक सकारात्मक परिणाम दाखविणारे ठरेल. या काळात तुम्हाला अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळेल. आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतील. या काळात ज्ञानात भर पडेल. प्रेमसंबंध सुखमय होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. विविध गोष्टी करण्याची संधी मिळेल. (टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)