Margashirsha Guruvar Vishesh Rashi Bhavishya In Marathi : गुरूवार १२ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी आज रात्री १० वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. परीघ योग आज दुपारी ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच अश्विनी नक्षत्र आज सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर भरणी नक्षत्र दिसेल. राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल.

त्याचप्रमाणे आज गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करुन महालक्ष्मीची पूजा केली जाते. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. तर आज मेष ते मीनपैकी कोणाचा दिवस सोन्यासारखा असेल हे आपण जाणून घेऊया…

१२ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ:- कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.

मिथुन:- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयि गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह:- मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या:- व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ:- आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

धनू:- जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर:- लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ:- भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:- स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर