November Astrology : २०२४ चा नोव्हेंबर महिना अत्यंत विशेष असणार आहे. या महिन्यात ग्रह राशींबरोबर नक्षत्र सुद्धा परिवर्तन करणार आहे ज्याचा थेट परिणाम राशिचक्रातील बारा राशींवर दिसून येईल. यावेळी शनि कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत विराजमान आहे पण १५ नोव्हेंबरला ते कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहे. तसेच या महिन्यात शुक्र, सूर्य आणि बुध सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे. तसेच याशिवाय चंद्र प्रत्येक अडीच दिवसामध्ये राशी परिवर्तन करताना दिसून येईल. ज्यामुळे कोणत्याही प्रकारे युती होऊन शुभ अशुभ परिणाम दिसून येईल. जाणून घेऊ या नोव्हेंबर महिन्यात कोणत्या राशींचे नशीब चमकू शकतात.

सूर्य गोचर नोव्हेंबर २०२४ (Surya Gochar 2024)

नोव्हेंबर महिन्यात सूर्य तुळमधून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १६ नोव्हेंबर सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि १५ डिसेंबर पर्यंत याच राशीमध्ये विराजमान राहणार आहे.
अशात वृश्चिक, मकर, कुंभ, सिंह, मेष आणि धनु राशीच्या लोकांना भरपूर लाभ दिसून येईल. खूप दिवसांपासून अडकलेले कामे पूर्ण होतील तसेच मान सन्मानामध्ये वृद्धी होईल. तसेच नोकरी व्यवसायामध्ये भरपूर लाभ मिळणार आहे.

हेही वाचा : डिसेंबरनंतर ‘या’ राशींच्या लोकांची चांदी! शनी शुक्राच्या संयोगाने होणार पैशांचा पाऊस अन् नोकरीत घवघवीत यश

शनि मार्गी २०२४ (Shani Margi 2024)

पंचागनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेला शनि कुंभ राशीमध्ये थेट चाल चालणार आहे. शनि मार्गी होत असल्याने अनेक राशींना त्याचा फायदा दिसून येईल. शनिच्या या चालीमुळे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना भरपूर लाभ होईल. या राशींचे नशीब चमकू शकते आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. या राशींचे आरोग्य उत्तम राहीन. यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल.

शुक्र गोचर नोव्हेंबर २०२४ (Shukra Gochar 2024)

शुक्र ग्रह २६ दिवसांमध्ये राशी परिवर्तन करतात. सुख समृद्धी, धन संपत्तीचे कारक शुक्र ७ नोव्हेंबर रोजी राशी परिवर्तन करणार आहे आणि धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या गोचरमुळे मेष, मिथुन, कन्या, तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल. या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेन तसेच यांना मोठा धनलाभ होईल. दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. तसेच कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता.

हेही वाचा : ‘या’ ५ राशींची होणार चांदी; १३ दिवसांनंतर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची होणार कृपा, मिळणार बक्कळ पैसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासिक राशिफल नोव्हेंबर 2024 (Monthly Horoscope November 2024)

ग्रहांची स्थिती पाहता नोव्हेंबर महिना अनेक राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकतो. करिअर व्यवसायात अपार यश आणि धनलाभ मिळू शकतो. नोव्हेंबर महिना मेष, वृषभ, कन्या, तुला आणि कुंभ आणि धनु राशीच्या लोकांसाठी उत्तम राहीन. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार. तसेच त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल.