Rahu Ketu Nakshatra Gochar : प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ग्रह नक्षत्र परिवर्तन म्हणजे ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतात. आता राहु आणि केतु एकाच दिवशी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. राहु आणि केतु दोन्ही खूप महत्त्वाचे ग्रह आहे. राहु हा भौतिक इच्छा आणि महत्त्वाकांक्षाचा कारक मानला जातो, तर केतु हा अध्यात्म, त्याग आणि अलिप्ततेचे प्रतीक आहे.
२० जुलै रोजी राहु केतु दोन्ही खळबळ निर्माण करणार आहे. हे दोन्ही क्रूर ग्रह एकत्र नक्षत्र गोचर करणार आहे, ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर दिसून येईल. राहु आणि केतुच्या नक्षत्र गोचरमुळे ३ राशींना अचानक मोठा धनलाभ मिळू शकतो. त्यांना नशीबाची साथ मिळू शकते. त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

राहु-केतुचे नक्षत्र गोचर

२० जुलैला राहु नक्षत्र परिवर्तन करून पूर्वभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. तर केतु २० जुलै रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. छाया ग्रह राहु केतुच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे ३ राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी राहु आणि केतुचे नक्षत्र परिवर्तन मोठा लाभ देणारे ठरू शकते. यांची आर्थिक स्थिती सुधारेल. या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो. कर्ज फेडण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नोकरी कणाऱ्या लोकांना नशीबाची साथ मिळेल. हे लोक प्रॉपर्टी वाहन खरेदी करू शकतात.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी राहु आणि केतुचा नक्षत्र परिवर्तन सकारात्मक फळ देणारा ठरू शकतो. या लोकांच्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. नवीन स्त्रोतांपासून धनप्राप्ती होईल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. बँक बॅलेन्स वाढणार. उच्च पदावर असणाऱ्या लोकांबरोबर संपर्क होईल.

मकर राशी

राहु आणि केतुचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये लाभदायक ठरू शकते. या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. हे लोक यशस्वीपणे आपले टार्गेट पूर्ण करेन. वैयक्तिक जीवनात आनंद दिसून येईल. या लोकांनी ठरवलेली योजना यशस्वी होईल. धन संपत्तीची बचत करण्यात हे लोक यशस्वी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)