Grah Gochar 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा दुर्मिळ असा योग तयार होत आहे. १५ जून २०२५ रोजी सूर्य मिथुन राशीत गोचर करणार आहे. विशेष म्हणजे आधीच या राशीत गुरु (बृहस्पति) आणि बुध हे दोन महत्त्वाचे ग्रह उपस्थित आहेत. सूर्याच्या प्रवेशामुळे या राशीत गुरु, सूर्य आणि बुध यांची तिकडी तयार होणार आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते. ही तिकडी म्हणजे ब्रह्मांडात एक मोठा सकारात्मक बदल घडवणारा क्षण आहे. यातून ‘बुधादित्य योग’, ‘गुरु आदित्य योग’ आणि ‘त्रिग्रही योग’ तयार होत आहेत. या तिन्ही योगांमुळे काही विशिष्ट राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. या तिन्ही शुभ योगांचा प्रभाव थेट आर्थिक प्रगतीवर होईल. मिथुन राशीत ग्रहांची ही युती आर्थिक स्थितीला बळकटी देईल. चला तर कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकतो पाहूया…

‘या’ राशींचे सुखाचे दिवस?

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी तिन्ही योग लाभदायी ठरु शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदार मंडळींना पगारवाढीची संधी मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. घर, वाहन सुखही लाभू शकतो.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी तिन्ही योग अत्यंत फलदायी ठरु शकतात. जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील. मार्केटिंगशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. घर आणि गाडी खरेदीसाठी संधी मिळू शकते. कामातील अडथळे दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत नवीन संधी मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा खूपच चांगली असेल. तुमच्या वडिलोपार्जित संपत्ती आणि बचतीमुळे तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

मकर

मकर राशीसाठी तिन्ही योग लाभदायक ठरु शकतात. जे नोकरीची वाट पाहत आहेत, त्यांना योग्य संधी मिळू शकते. या काळात, तुमच्या कष्टाचे खूप चांगले फळ मिळू शकते. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती सुधारु शकेल,  विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातील ताणतणाव संवादातून मिटण्याची शक्यता निर्माण होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)