Dashank Yog 2025 Impact in Marathiवैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. शनि हा नवग्रहांचा न्यायाधीश मानला जातो. शनि मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे. शनीदेव कोणत्याही मनुष्याच्या जीवनात शिस्त, संघर्ष आणि यश घेऊन येतो. शनीची स्थिती आपल्या कुंडलीतील त्याच्या उपस्थितीवर अवलंबून असते. सध्या शनी मीन राशीत विराजमान असून शुक्रासोबत ‘दशांक योग’ निर्माण केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज १३ जून रोजी शनी व शुक्र ३६ अंशांवर एकमेकांच्या समोर आले असून त्यामुळे एक अद्भुत योग तयार झाला आहे. यामुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…

शनीचा अद्भुत योग! ‘या’ राशींचे भाग्य अचानक पलटणार?

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी-शुक्राचा दशांक योग फारच फायदेशीर ठरु शकतो . कर्म व लाभ स्थानात या दोन ग्रहांचा प्रभाव असल्याने नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात या राशीच्या लोकांची मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे कौतुक, जबाबदारीची संधी आणि यश मिळू शकते. व्यवसायातील भागीदारांशी संबंध सुधारतील. आरोग्यही उत्तम राहील आणि समाजात मान सन्मानही वाढू शकतो.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना शनी-शुक्राच्या दशांक योगामुळे भौतिक सुखांचा भरपूर लाभ मिळू शकतो. प्रॉपर्टीत गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. नोकरी बदलाचे योग आहेत. व्यवसायात यश मिळू शकते. प्रेमसंबंध मजबूत होऊ शकतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळू शकते. प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला फायदा होऊ शकतो. आपल्या घरात शुभ आणि धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

कुंभ (Aquarius)

शनी-शुक्राच्या दशांक योगामुळे कुंभ राशींच्या लोकांचे सुखाचे दिवस येऊ शकतात. या काळात आश्चर्यजनक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः विदेश व्यापार, नवी नोकरी, सीनियर्सचा सपोर्ट आणि कौटुंबिक आनंद वाढू शकतो. उत्पन्नात वाढ होऊन अनेक स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. पैसा कमावण्याच्या अनेक वाटा उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुमच्यासाठी वाहन खरेदीचे योग आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)