Shani Budh Kendra Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायदेवता शनी हा सर्वांत क्रूर आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनी हा एकमेव असा ग्रह आहे, जो सर्वांत मंद गतीने भ्रमण करतो. त्यामुळे त्याचा प्रभाव राशींवर बराच काळ राहतो. शनी ग्रहाने सुमारे अडीच वर्षांनी राशिबदल करीत मीन राशीत प्रवेश केला आहे, जिथे तो २०२७ पर्यंत राहील. या काळात कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी त्याची युती किंवा दृष्टी असेल, ज्यामुळे अनेक प्रकारचे योग निर्माण होतील. त्यात ९ जूनला ग्रहांचा राजकुमार बुध आणि शनी यांच्या गोचराने केंद्र योग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे खालील तिन्ही राशींना बरेच फायदे मिळू शकतात.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ९ जून रोजी सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी शनी आणि बुध एकमेकांपासून ९० अंशांवर असतील, ज्यामुळे केंद्र योग तयार होत आहे.
मकर
शनी-बुध ग्रहाचा केंद्र योग मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत प्रचंड यश मिळू शकते. त्यामुळे आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठीही यशस्वी ठरू शकतो. लेखनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळू शकतात. जीवनात आनंद व समृद्धी नांदू शकते. कुटुंबासह चांगला वेळ घालवता येऊ शकतो. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. धार्मिक बाबींमध्ये तुमची आवड वाढू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो आणि तुमचे आरोग्यही चांगले राहणार आहे.
कुंभ
केंद्र योग कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांवर शनीचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यासह बुध या राशीत असल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. आयुष्यात दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या आता संपू शकतात. त्यासह आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता. परदेशात काम करणाऱ्या लोकांनाही खूप फायदे मिळू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही खूप फायदे मिळू शकतात. प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी-विक्रीतून तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. कुटुंबातील आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. वाद घालण्यापूर्वी विचार करा. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
वृषभ
बुध शनीच्या केंद्र योगाने वृषभ राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत लाभ मिळू शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही चांगले काम करू शकता. तुमच्या मनाला शांती मिळेल, ज्यामुळे मानसिक ताण थोडा कमी होऊ शकतो. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे तुम्ही अनेक क्षेत्रांत यशस्वी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे खूप वर्चस्व असणार आहे. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही करिअरमध्ये पुढे जाऊ शकता. नोकरीत पदोन्नतीचीही शक्यता आहे. आयुष्यात अनेक काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. त्यासह मुलांबद्दलच्या चिंताही संपतील. व्यवसायातही खूप फायदे मिळू शकतात. आर्थिक अडचणी आता दूर होऊ शकतात. त्यामुळे पैशांची कमी आता जाणवणार नाही. तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.