Surya Grahan 2023 Dates and Time: २०२३ हे नववर्ष ज्योतिषीय व खगोलीय घटनांच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. याच वर्षात शनि व गुरु हे महत्त्वाचे व मोठे ग्रह आपल्या राशीतून इतर राशींमध्ये परिवर्तन करणार आहेत. तर येत्या वर्षात २ चंद्रग्रहण व २ सूर्यग्रहण सुद्धा लागणार आहेत. ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार, सूर्य ग्रहण भारतातुन स्पष्ट दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येणार आहे. आपल्याला माहीतच असेल जेव्हा सूर्य, चंद्र व पृथ्वी एकाच रांगेत सरळ येतात तेव्हा सूर्य ग्रहण लागते. सूर्य ग्रहणाच्या १२ तास आधीच सुतक काळ सुरु होतो. २०२३ मध्ये नेमके कोणत्या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे आणि त्याचा प्रभाव १२ राशींवर कसा दिसून येईल हे जाणून घेऊयात..

Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा

खग्रास सूर्यग्रहण (२० एप्रिल गुरुवार २०२३ )

आर्यभट्ट पंचांगाच्या माहितीनुसार भारतात २० एप्रिल २०२३ ला सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहण सुरु होणार असून दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत ग्रहण स्थिती कायम असणार आहे. हे ग्रहण पूर्वआशिया, ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिकासह काही मोजक्याच देशांमध्ये पाहायला मिळणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नसले तरी राशींवर ग्रहणाचा प्रभाव दिसणार आहे.

पूर्ण सूर्य ग्रहण (१४- १५ ऑक्टोबर २०२३ आश्विन अमावस्या)

आर्यभट्ट पंचांगाच्या माहितीनुसार पूर्ण सूर्य ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी सुरु होणार असून मध्यरात्री २ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. हे ग्रहण सुद्धा भारतात दिसणार नाही पण याचा प्रभाव तुमच्याही राशीवर पाहायला मिळू शकतो.

हे ही वाचा<< २०२३ सुरु होताच ‘या’ ४ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? शनिचा दुर्मिळ ‘महालक्ष्मी राजयोग’ तुमच्या राशीत आहे का?

१२ राशींवर कसा दिसणार सूर्य ग्रहणाचा प्रभाव?

मेष :- मन अस्वस्थ होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ :- कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. पैसे खर्च करताना काळजी घ्या.

मिथुन:- आर्थिक दृष्टीने समृद्धीचा काळ सुरु होऊ शकतो. आपल्याला अचानक धनलाभाची संधी मिळणार आहे.

कर्क :- ग्रहणाच्या प्रभावाने आरोग्यात बिघाड होऊ शकतो.

सिंह :- वैवाहिक जीवनात गैरसमज वाढू शकतात पण तुम्ही शांत राहिल्यास कमी भांडण होऊ शकते.

कन्या :- कामाच्या ठिकाणी अचानक पदोन्नतीची संधी येईल पण तुम्ही योग्य निर्णय न घेतल्यास डाव उलटा पडू शकतो.

हे ही वाचा<< धन राजयोग बनल्याने ‘या’ ४ राशी होणार भरपूर श्रीमंत? २०२३ सुरु होताच ‘या’ रूपात बक्कळ धनलाभाची संधी

तूळ :- तूळ राशीच्या राजकारणाशी संबंधित व्यक्तीला अनेकांचा विरोध सहन करावा लागू शकतो.

वृश्चिक :- तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. हे निर्णय जर चपखल बसले तर तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

धनु :- ग्रहण आपल्यासाठी आर्थिक नफा घेऊन येऊ शकते. व्यवसायातून धनलाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< २०२३ च्या ‘या’ महिन्यात शनिची साडेसाती संपून धनु राशीला प्रचंड धनलाभाची संधी; नववर्षात आरोग्य व प्रेम देणार का साथ?

मकर :- बेरोजगारांना नोकरीची ऑफर येऊ शकते. संवाद कौशल्यावर कामी केल्यास लवकरच आर्थिक लाभ होऊ शकतो.

कुंभ :- करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. शनीच्या प्रभावासह सूर्यग्रहण आल्याने तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

मीन :-कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक मेहनत करावी लागेल पण याचा फायदा धनलाभाच्या रूपात होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)