Hanuman Jayanti Auspicious Panch Grahi Yoga: रामनवमीनंतर आता रामभक्त हनुमानाची जयंती काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा २३ एप्रिल म्हणजेच मंगळवारी हनुमान जयंती साजरी होणार आहे. मंगळवार हा मुळातच हनुमानाच्या पूजनाचा वार मानला जातो त्यामुळे याच दिवशी हनुमान जन्मोत्सवाची तिथी जुळून येणे हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. या दिवशी चित्र नक्षत्रात सिद्ध योग असणार आहे. तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यादिवशी मीन राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. कुंभ राशीत सुद्धा शनी शश राजयोग बनवणार आहे. या शुभ योगांचा प्रभाव येत्या कालावधीत तीन राशींवर दिसून येणार आहे. या राशींना चारही बाजूंनी धनप्राप्ती होण्याची चिन्हे आहेत. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

हनुमान जयंतीला ‘या’ ३ राशींना पवनपुत्र देतील वाऱ्याच्या वेगाने प्रगती

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या मंडळींची आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारू शकते. प्रत्येक कामामध्ये प्रगती साथ देईल. विशेषतः बेरोजगारांसाठी हा कालावधी शुभ सिद्ध होऊ शकतो ज्यामुळे लवकरच चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. प्रॉपर्टीच्याबाबत कोर्टात चालू असलेल्या खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय लागू शकते. गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मिथुन राशीच्या लोकांना मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे खूप कौतुक झाल्याने पगारवाढीवर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. जुन्या ताण-तणावातून मुक्ती मिळू शकते. समाजातील तुमचे स्थान भक्कम होऊ शकते. व्यवसायात नवीन संपर्क जोडले जातील जे धनलाभाच्या मार्ग ठरतील.

हे ही वाचा<< अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

वृश्चिक राशीच्या मंडळींना भागीदारीच्या व्यवसायातून प्रचंड मोठा धनलाभ मिळू शकतो. या कालावधीत तुमच्या व्यवसायाला गती लाभून आर्थिक फायदे वाढू शकतात. करिअरसह वैवाहिक आयुष्यात नाती जपण्यात काही प्रमाणात यश येईल. प्रेमाचा गोडवा वाढू शकतो. तुमच्या कुंडलीत परदेश प्रवासाचा योग आहे. नातेवाईकांमध्ये आपला मान-सन्मान वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)