Shani enters Purva bhadrapada: ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्मफळदाता, न्यायाधीश आणि दंडाधिकारी मानले जाते. शनीदेव साधारणपणे ३० महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. तसेच ते मध्येच नक्षत्र बदलही करतात.

ऑक्टोबर महिन्यात शनीदेव पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचे स्वामी देवगुरु आहेत. त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. मालमत्तेचा लाभ मिळू शकतो आणि करिअर किंवा व्यवसायात नोकरीच्या संधी मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मिथुन राशी (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी शनीदेवांचा नक्षत्र बदल सकारात्मक ठरू शकतो. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून कर्मभावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कामधंद्यात चांगली प्रगती मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. नवे काम सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्जनशीलतेची आणि नेतृत्वकौशल्याची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवी जबाबदारी किंवा प्रगतीची संधी मिळू शकते. तसेच या काळात तुमचे वडिलांशी संबंध मजबूत राहतील.

मकर राशी (Capricorn Horoscope)

शनीदेवांचा नक्षत्र बदल मकर राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनीदेव तुमच्या राशीच्या तिसऱ्या स्थानी भ्रमण करतील. त्यामुळे या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. तसेच या काळात वाहन आणि मालमत्तेचा आनंद मिळू शकतो. याच वेळी तुम्हाला भावंडांचा पाठिंबा मिळेल. नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी किंवा नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी हा काळ योग्य आहे. नातेसंबंधातही समन्वय राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नाते अधिक घट्ट अनुभवू शकाल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

शनीदेवांचा नक्षत्र बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून धनस्थानात भ्रमण करत आहेत आणि ते तुमच्या राशीचे स्वामीही आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. हा काळ तुमच्यासाठी सामाजिक आणि आर्थिक यश आणू शकतो. मित्र आणि गटांसोबतच्या सहकार्याने मोठा फायदा मिळेल. नेटवर्किंग करा, सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा आणि तुमच्या योजना पूर्ण करा. तसेच या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.