Kedar Yog In Kundali: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी गोचर करून राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. या ग्रह गोचरासह काही वेळा अत्यंत शुभ राजयोग सुद्धा निर्माण होत असतात. काही राजयोग हे प्रचंढ दुर्मिळ असतात. ज्योतिष अभ्यासक सांगतात की २०२३ हे वर्ष शुभ योगांनी समृद्ध आहे. येत्या २३ एप्रिलला शुद्दच तब्बल ५०० वर्षांनी केदार योग निर्माण होत आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार कोणत्याही राशीच्या जन्मकुंडलीत जेव्हा चौथ्या व सातव्या स्थानी ग्रह प्रबळ होतात तेव्हा हे स्थान अत्यंत शुभ मानले जाते. केदार योग बनल्याने काही राशींच्या भाग्यात सोन्याहून पिवळा सुखाचा काळ सुरु होण्याची चिन्हे आहेत. या राशींना प्रचंड धनलाभासह प्रगतीची मोठी संधी चालून येणार आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका पाहूया…

मेष रास (Aries Zodiac)

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या गोचर कुंडलीत लग्न स्थानी सूर्य, गुरु, राहू, बुध विराजमान आहेत. तर दुसऱ्या स्थानी शुक्र व तिसऱ्या स्थानी मंगळ व चंद्र स्थिर आहेत. अकराव्या स्थानी शनिदेवाची कृपा असणार आहे. ही ग्रह स्थती सुद्धा अत्यंत पवित्र मानली जाते यामुळे अगोदरच राजयोग तयार होत आहेत. याशिवाय शनिदेव ११ व्या स्थानी असल्याने मेष राशीला अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. या काळात तुमचा मान- सन्मान वाढीस लागेल. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्तीची चिन्हे आहेत. जर कोणत्या नवीन कामाची सुरूवात करण्याचा मानस असेल तर हा काळ यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो.

सिंह रास (Leo Zodiac)

केदार योग हा सिंह राशीच्या व्यक्तीसाठी अनुकूल ठरू शकतो. सिंह राशीत ७ ग्रह गोचर कुंडलीत सातव्या, नवव्या, दहाव्या लाभ स्थानी स्थिर आहेत. या काळात विचारपूर्वक व काळजीपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला प्रचंड लाभ घडवू शकतात. या काळात भागीदारीच्या कामातून अधिक लाभाचे संकेत आहेत. तुम्हाला नव्या नोकरीच्या संधी लाभू शकतात. नोकरदार मंडळींसाठी पदोन्नति व पगारवाढीचे संकेत आहेत. व्यापारी वर्गाला या काळात खूप लाभ होऊ शकतो व कार्यक्षेत्र विस्तारले जाऊ शकते.

हे ही वाचा<< शनिदेव राहूच्या नक्षत्रात झाले शक्तिशाली; पुढील ६ महिन्यात ‘या’ ४ राशी होऊ शकतात कोट्यवधींचे मालक

धनु रास (Dhanu Zodiac)

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार धनु राशीच्या गोचर कुंडलीत तिसऱ्या,पाचव्या, सहाव्या व सातव्या स्थानी केदार योग निर्माण होत आहे. ज्योतिष अभ्यासकांनी हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याचे म्हंटले आहे. तसेच शेअर मार्केट गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो, कोर्टाच्या खटल्यांपासून शक्य तितके लांब राहणे उत्तम ठरेल. या काळात तुमचे आर्थिक मिळकतीचे स्रोत सुद्धा वाढू शकतात. तुम्हाला जोडीदारासह सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)