5th August 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: आज ५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावणाला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी शिव भक्त महादेवाची विशेष साधना करतात. तर आजच्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आज आश्लेषा नक्षत्र ३ वाजून २० मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज व्यतिपात योग १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल. आज राहू काळ सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ४ मिनिटांपर्यंत राहील. तसेच अभिजित मुहूर्त सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत असेल. तर श्रावणातला पहिला सोमवार मेष ते मीन या १२ राशींना कसा जाईल, कोणावर असेल महादेवाची कृपा ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

०५ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. मनावर कोणताही ताण घेऊ नये.

वृषभ:- कामात चांगली प्रगती करता येईल. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका. आखलेल्या योजनांवर भर द्या.

मिथुन:- मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

कर्क:- भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल.

सिंह:- जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामातील समस्या सोडवता येतील. मनात अनामिक भीती दाटून येईल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

कन्या:- घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल. आर्थिक गणिते सुधारतील. योजनेला मूर्त रूप द्याल. विरोधकांकडे लक्ष ठेवा.

तूळ:- घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका. एखादी घटना मन खिन्न करू शकते. विरोधक नरमाईने घेतील. हातातील काम पूर्ण होईल.

वृश्चिक:- लहान प्रवास घडेल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

धनू:- जोडीदाराशी सुसंवाद घडेल. कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. बचतीच्या योजना आखाव्यात. मुलांचा उत्साह वाढीस लागेल.

मकर:- व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात. व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. निष्काळजीपणा करू नका.

कुंभ:- चांगले मनोरंजन घडेल. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे. कामाची दिवसभर धावपळ राहील.

मीन:- कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा. खर्चाला आवर घाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर