Yogini Ekadashi Astrology: यंदा काही ठिकाणी २१ जून रोजी तर काही ठिकाणी २२ जून रोजी योगिनी एकादशी साजरी केली जात आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकदशीला योगिनी एकादशी म्हणतात. या एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये योगिनी एकादशीचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे. या दिवशी उपवास केल्याने आणि विष्णुची पूजा केल्याने ८८ हजार ब्राम्हणांना जेवण देण्याबरोबरीचे पुण्य लाभते. असं म्हणतात, या उपवासाने पाप दूर होते, आयुष्यात सुख समृद्धी लाभते. अडथळे दूर होतात आणि आयुष्य सुखमय होते. यंदा योगिनी एकादशीच्या दिवशी काही शुभ योग निर्माण होत आहे त्यामुळे राशी चक्रातील चार राशींवर विष्णूची कृपा दिसून येईल. त्या चार राशी कोणत्या, हे जाणून घेऊ या.

सिंह राशी (Leo Horoscope)

या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. कामामध्ये फोकस वाढवणार आणि टीमचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसून येईल. प्रेम प्रकरणात नावीन्य येईल. जुने गैरसमज दूर होऊ शकतात. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळू शकते. आरोग्य उत्तम राहीन. कलात्मक क्षेत्राशी संबंधित लोकांचे कौतुक होईल. नवीन विचार या लोकांच्या जीवनात नवीन दिशा देऊ शकतात.

तुळ राशी (Libra Horoscope)

नवीन संबंध निर्माण होऊ शकतात, जे पुढे लाभदायक ठरू शकतात. हे लोक आर्थिकदृष्ट्‍या सक्षम होईल. कुटुंबात गोडवा दिसून देईल. ऑफिसमध्ये तुमच्या सल्ल्यांचे कौतुक केले जाईल. विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधिक शुभ सूचना मिळू शकते. आरोग्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. नियमित थोडा व्यायाम करावा. कायदेशीर प्रकरणात निर्णय या लोकांच्या बाजूला येऊ शकतो. जुन्या योजनांना पुन्हा सक्रिय करू शकता

धनु राशी (Sagittarius Horoscope)

प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात जे लाभदायक राहीन. कामामध्ये उत्साह दिसून येईल आणि नवीन लोकांशी संवाद साधू शकाल. कुटुंबात आपआपसात समजूतदारपणा वाढेल. जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची संधी आहे. साहित्य, लेखन किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना सन्मान मिळू शकतो. प्रोफेशनल जीवनात नवीन जबाबदारी मिळू शकते.

मकर राशी (Capricorn Horoscope)

आर्थिक प्रकरणात सतर्कता वाढणार. नवीन डील विचार करून करावी. घरात सुख शांती लाभेल. करिअरमध्ये स्थिरता दिसून येईल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात गोडवा दिसून येईल. नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)