आलिशान कार निर्माता कंपनी ऑडीच्या इलेक्ट्रिक कारमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी आता लवकरच ई-रिक्षामध्ये दिसणार आहे. जर्मन-भारतीय स्टार्टअप नूनम भारतात तीन इलेक्ट्रिक रिक्षा लॉन्च करणार आहे.

या ई-रिक्षांमध्ये ऑडी ई-ट्रॉन कारच्या जुन्या बॅटरी वापरण्यात येणार आहेत.  या हाय व्होल्टेज बॅटरीच्या पुनर्वापराचे परिणाम काय असतील हे या प्रकल्पाद्वारे स्टार्ट-अप कंपनीला हे जाणून घ्यायचे आहे.

तसंच या प्रकल्पाचा उद्देश जुन्या बॅटरीजचा वापर करून त्यांचा सेकेंड लाइफ पावर स्टोरेज सिस्टम म्हणून विकसित करणे हा आहे. जेणेकरून संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येईल.

बर्लिन, जर्मनी आणि बंगलोर, भारत ही स्टार्ट अप कंपनी एक नॉन प्रॉफिटेबल स्टार्टअप कंपनी असून याचं फंडिंग ऑडी एनवायर्नमेंटल फाउंडेशन द्वारा केलं जातं. हा प्रकल्प ऑडी, नूनम आणि ऑडी एन्व्हायर्नमेंटल फाउंडेशनचा संयुक्त प्रकल्प आहे.

आणखी वाचा : Hero Splendor पेक्षा कमी किंमतीत मिळतेय Maruti WagonR, जाणून घ्या काय आहे ऑफर?

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून स्टार्टअपने ऑडीच्या नेकरसुलम साईटवर त्यांच्या टीमच्या मदतीने  ई-रिक्षांचे  तीन प्रोटोटाइप विकसित केले आहेत.
यांच्या चाचण्यांसाठी ऑडी ई-ट्रॉनच्या ताफ्यात वापरल्या जाणार्‍या बॅटरीचा वापर करण्यात आलाय.

या प्रकल्पांतर्गत या इलेक्ट्रिक रिक्षा नॉन प्रॉफिट ऑर्गनायजेशन म्हणजेच एनजीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एनजीओ आणि लोक यांच्यात मध्यस्थी राहणार नाहीत. या योजनेत महिलांना प्राधान्य देत या इलेक्ट्रिक रिक्षा फक्त महिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

आणखी वाचा : जर तुम्हाला Bajaj Avenger 220 आवडत असेल, तर ‘या’ क्रूझर बाईकवरची ऑफर एकदा पाहाच

नूनम प्रकल्पाचे सह-संस्थापक प्रदीप चॅटर्जी यांनी सांगितले की, ऑडी ई-ट्रॉनमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरी अजूनही खूप शक्तिशाली आहेत आणि जर या बॅटरी योग्य प्रकारे वापरल्या गेल्या तर त्याचा खूप मोठा फायदा होईल. यासोबतच ही इलेक्ट्रिक रिक्षा लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासही मदत करेल.

या प्रकल्पावर काम करणार्‍या स्टार्टअप कंपनीचे म्हणणे आहे की ऑडी ई-ट्रॉनच्या वापरलेल्या बॅटरीने बनवलेल्या ई-रिक्षा भारतीय रस्त्यांसाठी अधिक चांगल्या ठरतील. कारण या ई-रिक्षा फार वेगवानही नाहीत आणि लांबचे अंतर कापण्यायोग्यही नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टार्टअप २०२३ च्या सुरुवातीला  ऑडी ई-ट्रॉन बॅटरीसह पायलट प्रोजेक्ट म्हणून  या ई-रिक्षांचे वितरण सुरू करेल.