2024 Bajaj Chetak : गेल्या काही वर्षांमध्ये ऑटो क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर्स ग्राहकांच्याही पसंतीस उतरताना दिसत आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये ‘हीरो इलेक्ट्रिक’, ‘एथर’, ‘ओला’, ‘टीव्हीएस’ अशा कंपन्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स प्रचलित आहेत. या स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी आता बजाज त्यांची ‘चेतक इलेक्ट्रिक स्कूटर’ नव्या रूपात घेऊन आले आहेत..

बजाज ऑटोने जानेवारी २०२२ पासून भारतात चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या १,००,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. आज त्यांनी २०२४ या वर्षात बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर नव्या रूपात लॅान्च केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर १,१५,००१ रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. ही स्कूटर टीव्हीएस iQube, हीरो विडा व्ही १ व ओला एस १ ला टक्कर देईल.

आपण बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर २०२४ ची किंमत आणि फीचर्स पाहू.

चेतक इलेक्ट्रिक स्कूटर २०२४ मध्ये दोन प्रकार पुढीलप्रमाणे : १. अर्बन (Urbane) आणि २. प्रीमियम (Premium). तसेच चेतक अर्बन Coarse ग्रे, सायबर व्हाइट, ब्रुकलिन ब्लॅक व इंडिगो मेटॅलिक ब्ल्यू अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर, चेतक प्रीमियम हेझलनट, इंडिगो मेटॅलिक ब्ल्यू व ब्रुकलिन ब्लॅक या रंगांत उपलब्ध आहे.

ARAI प्रमाणित २०२४ च्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १२७ किलोमीटर (127km) उच्च श्रेणी असल्याचा दावा केला जातो; तसेच यात नवीन 3.2kWh बॅटरी आहे. तसेच या स्कूटरचा उच्च वेग 73kmph आहे. चेतक प्रीमियम ऑनबोर्ड 800W चार्जरसह येते. नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर पूर्वीप्रमाणेच ऑल-मेटल बॉडी आहेत (all-metal body) आणि सर्व इलेक्ट्रिकल घटकांसह IP67 रेटेड वॉटर रेझिस्टन्स आहे.

हेही वाचा…देशात दाखल झालेल्या ‘या’ नव्या बाईकसमोर बुलेटही विसरुन जाल; पण, किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम

चेतक प्रीमियममध्ये पाच इंचांचा TFT डिस्प्ले आहे. हे TecPac बरोबर मिळू शकते; ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल, कॉल मॅनेजमेंट आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिल होल्ड मोड (hill hold mode) यांसारखी अधिक फीचर्स उपलब्ध आहेत. खास गोष्ट अशी की, या इलेक्ट्रिक स्कूटरला रिव्हर्स मोडदेखील आहे .

चेतक प्रीमियम स्कूटरमध्ये रिअर ब्लिंकर, सेल्फ-कॅन्सलिंग ब्लिंकर्स, डावे व उजवे कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक हॅण्डल आणि स्टीअरिंग लॉक, सीट स्विचेस व हेल्मेट बॉक्स लॅम्प आदी गोष्टींचा समावेश आहे. बजाज ऑटोने चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ‘ग्रीन स्कोअर’ (Green Score)देखील जोडला आहे; ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या कार्बन फूटप्रिंट मॉनिटर करणे, इंधनाचा वापर कमी करणे आणि आर्थिक बचत करणे शक्य होईल.

खाली व्हेरिएंटनुसार बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या २०२४ च्या किमती (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) येथील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१. बजाज चेतक अर्बन : १,१५,००१ रुपये आणि २. बजाज चेतक प्रीमियम : १,३५,४६३ रुपये अशा किमतीत उपलब्ध असणार आहे.