Cheapest Electric Cars in India: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहाता, इलेक्ट्रिक कार हा एक चांगला पर्याय ठरतो आहे. ऑटोमोबाईल उत्पादक आणि सर्व सामान्य लोकांचा देखील कल या इलेक्ट्रिक कार घेण्याकडे वळतो आहे. बहुतेक लोकांनी आता इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार सुरू केला आहे. काही जणांनी घेतली सुद्धा असेल. परंतु जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्वस्तात कोणती इलेक्ट्रिक कार विकत घेता येईल, ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. भारतात १० लाख रुपयांच्या रेंजमधल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या आहेत. जाणून घेऊया या कार कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

​Tata Tiago EV
टाटा मोटर्सने अलिकडेच देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्ही अवघ्या ८.४९ लाख रुपये इतक्या किंमतीसह सादर केली आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ११.७९ लाख रुपये इतकी आहे. ही दिल्लीतली एक्स शोरूम किंमत आहे. या कारमध्ये १९.२kWh बॅटरीचा पर्याय देखील मिळेल. या बॅटरीसह ही कार २५० किमीपर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. दररोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसला ये-जा करण्यासाठी ही एक उत्तम कार आहे. कंपनीने या कारमधील मोटर आणि बॅटरीवर ८ वर्ष किंवा १,६०,००० किलोमीटरपर्यंतची वॉरंटी दिली आहे.

​PMV EaSE
पीएमव्ही इलेक्ट्रिक या मुंबई बेस्ड इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीची PMV EaSE इलेक्ट्रिक कार नुकतीच भारतात लाँच झाली आहे. ही २ सीटर मायक्रो इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ही कार केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ४.७९ लाख रुपये इतकी आहे. ही एक्स शोरूममधली किंमत आहे. या कारमध्ये ४८V क्षमतेची लिथियम आयन बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर तगडी ड्रायव्हिंग रेंज देते. यामध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या मोड्सनुसार ही कार १२०, १६० आणि २०० किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.

(आणखी वाचा : Popular Car: सचिन तेंडुलकर-जॉन अब्राहमची ‘ही’ आवडती कार आता बाजारपेठेत दिसणार नाही; किंमत होती कोटींमध्ये!)

​Mahindra E Verito
इलेक्ट्रिक कारच्या बाबतीतही महिंद्रा खूप वेगाने पुढे जात आहे. महिंद्राची इलेक्ट्रिक कार Mahindra E-Verito जबरदस्त फीचर्ससह सुसज्ज आहे. एकदा ही कार पूर्ण चार्ज झाली की, तुम्ही १४० किमी पर्यंत गाडी चालवू शकता. यात २१.२ kWh ची बॅटरी आहे, जी १२ तासात पूर्णपणे चार्ज होते.

​Mahindra E Verito
इलेक्ट्रिक कारच्या बाबतीतही महिंद्रा खूप वेगाने पुढे जात आहे. महिंद्राची इलेक्ट्रिक कार Mahindra E-Verito जबरदस्त फीचर्ससह सुसज्ज आहे. एकदा ही कार पूर्ण चार्ज झाली की, तुम्ही १४० किमी पर्यंत गाडी चालवू शकता. यात २१.२ kWh ची बॅटरी आहे, जी १२ तासात पूर्णपणे चार्ज होते. ही कार ८६ किमी प्रति तास इतका टॉप स्पीड देते.

MG Air EV
MG Air EV ही गाडी २०२३ Auto Expo सादर केली जाण्याची शक्यता आहे. नुकतंच या गाडीची एक झलक दिसून आली. MG Air EV मध्ये दोन बॅटरी पॅक असतील. एक बॅटरी १७.३ kWh आणि दुसरी २६.७ kWh युनिटची असेल. कंपनीचा दावा आहे की, छोटी बॅटरी २०० किमीपर्यंतची रेंज देते, तर मोठी बॅटरी ३०० किमीपर्यंत चालते. दोन्ही बॅटरी पॅकमध्ये मागील एक्सलवर इलेक्ट्रिक मोटर मिळते जी ४१ PS ची पॉवर जनरेट करते. ही स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy these four electric cars in india under 10 lakhs pdb
First published on: 02-12-2022 at 11:14 IST