Hyundai Creta Ev Launch In India : संपूर्ण जग आता इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करू लागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी हैराण झालेले लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे आशेने पाहात आहेत. गेल्या काही वर्षांपासून टेस्ला ही अमेरिकन वाहन निर्माती कंपनी जगभरातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारावर वर्चस्व गाजवतेय. मात्र आता ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसारख्या कंपन्या देखील या बाजारात उतरल्या आहेत. त्याचबरोबर लोकांना परवडणाऱ्या कार्सची निर्मीती करणाऱ्या जगभरातील अनेक वाहन कंपन्या आपापल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. अशातच ह्युंदाई मोटर इंडियाने आज १७ जानेवारी २०२५ रोजी इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो मध्ये आपली क्रेटा ईव्ही लाँच केली आहे.

सेफ्टी फीचर्स

सेफ्टीसाठी या SUV मध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंगसह EBD, ADAS लेव्हल 2, ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट आणि ESP सारखी फीचर्स असतील. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Creta EV मध्ये 10.25- इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, कीलेस एंट्री, रियर एसी व्हेंट्स, वायरलेस फोन चार्जर सारखी फीचर्स दिसतील.

४७३ KM ची रेंज अन् ५८ मिनिटांत फुल चार्ज

ह्युंदाई क्रेटा ईव्ही ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ४७३ किलोमीटर्स अंतर जाऊ शकते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीला ५१.४kWh आणि ४२ kWh असे दोन बॅटरी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. कंपनीने असा दावा केला आहे, की ५१.४kWh बॅटरी व्हॅरिएंट कार एका फुल चार्जमध्ये ४७२ किलोमीटर्स जाऊ शकते. तसंच, ४२kWh बॅटरी व्हॅरिएंट एका चार्जमध्ये ३९० किलोमीटर्स जाऊ शकते.

किंमत किती ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्युंदाई क्रेटाच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची एक्स शोरूम किंमत १७ लाख ९९ हजार रुपयांपासून सुरू होते. या किमतीत या गाडीचा बेस व्हॅरिएंट उपलब्ध आहे. तसंच, या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत १९ लाख ९९ हजार रुपये आहे. अर्थात या प्रारंभिक किमती आहेत. म्हणजेच कंपनी या किमतींमध्ये कधीही बदल करू शकते.