scorecardresearch

Premium

EV सेगमेंटमध्ये महिंद्राचे वर्चस्व वाढणार; लॉन्च करणार ‘या’ इलेक्ट्रिक कार्स, संपूर्ण यादी एकदा पाहाच

महिंद्रा अँड महिंद्रा एक प्रमुख एसयूव्ही निर्माता कंपनी आहे.

Mahindra to launch 5 electric SUV 2026 in India
२०२६ पर्यंत महिंद्रा कंपनी ५ इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे. (Image Credit-mahindra)

देशामध्ये सध्या SUV खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असलेल्या एसयूव्ही लॉन्च करत असतात. तसेच यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा एक प्रमुख एसयूव्ही निर्माता कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मागील वर्षी इंग्लंडमध्ये आपले नवीन EV ब्रँड सादर केले होते. आता २०२६ पर्यंत भारतात ५ इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याची तयारी सुरु असल्याचे कंपनीने सांगितले. अपकमिंग इलेक्ट्रिक व्हेइकल्स महिंद्राच्या अत्याधुनिक INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित असतील.

Mahindra XUV.e8 (लॉन्च टाइमलाइन : डिसेंबर २०२४)

महिंद्रा XUV.e8 ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. तसेच हिला डिसेंबर २०२४ पर्यंत लॉन्च करण्यात येणार आहे. हे मॉडेल XUV700 चे इलेक्ट्रिफाइड एडिशन आहे ज्यात ८० kWh क्षमतेची बॅटरी पॅक सुविधा असेल.

vikram kumar doraiswami
भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखले; स्कॉटलंडमध्ये खलिस्तानवाद्यांचे कृत्य
Diplomat Stopped From Entering Gurdwara
खलिस्तान्यांनी ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखलं, व्हिडीओ व्हायरल
Do you need multivitamin supplement Why a balanced diet is still the best nutrient boost
मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्सची गरज आहे का? संतुलित आहार हा अजूनही सर्वोत्तम पोषक घटक का आहे?
9th edition, World of Concrete India (WIKI), october, mumbai, concrete industry,
बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण

हेही वाचा : एसयूव्ही सेगमेंटमध्ये Hyundai चा दबदबा वाढणार; लॉन्च झाले ‘या’ कार्सचे अ‍ॅडव्हेंचर एडिशन, किंमत…

Mahindra XUV.e9  (लॉन्च टाइमलाइन : एप्रिल २०२५ )

त्यापाठोपाठ महिंद्रा XUV.e9 ही इलेक्ट्रिक कार एप्रिल २०२५ पर्यंत बाजारात लॉन्च केली जाण्याची अपेक्षा आहे. पाच सिट्सची जागा असणाऱ्या या एसयूव्हीची लांबी ४,७९० मिमी , रूंदी १,९०५ मिमी आणि उंची १,६९० मिमी इतकी असेल. कंपनी या मॉडेलसह पॉवरट्रेन शेअर करू शकते.

Mahindra BE.05 (लॉन्च टाइमलाइन : ऑक्टोबर २०२५ )

महिंद्राच्या BE सेगमेंटमध्ये तीन इलेक्ट्रिक एसयूव्हीचा समावेश असेल. BE.05, BE.07 आणि BE.09.महिंद्रा BE.05 ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारतात लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. हे स्पोर्ट युटिलिटी वाहन असेल. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Mahindra BE Rall-E (लॉन्च टाइमलाइन : ऑक्टोबर २०२५ )

महिंद्रा BE रोल ई, ही BE.05 इलेक्ट्रिक SUV चे अधिक ऑफ-रोड-केंद्रित व्हर्जन आहे. हे हैदराबादमधील महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिवलमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही २०२५ पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 2024 Kawasaki Ninja 650: स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये लॉन्च झाली कावासाकी निंजा ६५०, किंमतीसह जाणून घ्या नवीन फीचर्स

Mahindra BE.07 (लॉन्च टाइमलाइन : ऑक्टोबर २०२६ )

या लिस्टमध्ये शेवटच्या यादीमध्ये नाव आहे ते म्हणजे महिंद्रा BE.07 चे. BE.07 आहे जी, BE.05 पेक्षा वेगळी, बॉक्सी डिझाइनसहएक पारंपरिक SUV असेल. ही ऑक्टोबर २०२६ पर्यंत लॉन्च केली जाण्याची अपेक्षा आहे. मात्र महिंद्रा कंपनीने अद्याप फ्लॅगशिप BE.09 coupe SUV च्या लॉन्चिंगची टाइमलाइन उघड केलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra and mahindra company launch 5 ev be 07 and xuv e8 suv india by 2026 check list tmb 01

First published on: 08-08-2023 at 12:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×