Price hike in Cars: येत्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये भारतात वाहने महाग होणार आहेत. भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांनी पुढील महिन्यापासून विविध मॉडेल्सच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. वाढत्या इनपुट खर्चाची भरपाई करणे आणि एप्रिल २०२३ पासून लागू होणार्‍या कठोर उत्सर्जन नियमांचे पालन करणे, हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीमुळे वाहनांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

पुढील वर्षांत ‘या’ वाहनांच्या किमतीत होणार वाढ

१) Honda: जपानी कार निर्माता कंपनी आपल्या वाहनांच्या किंमती ३०,००० रुपयांपर्यंत वाढ करु शकते.

२) Hyundai India: किमतीतील वाढ सर्व मॉडेल्समध्ये भिन्न असतील आणि किमती जानेवारी २०२३ पासून लागू होताल.

३) Jeep India: जीप एसयूव्ही सर्व मॉडेल्सच्या किमतीत २-४% वाढ करण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : Second Hand CNG Cars: ‘या’ आहेत ४ लाखांपेक्षा कमी किमतीत 34kmpl मायलेज देणाऱ्या सीएनजी कार )

४)  Maruti Suzuki: सतत खर्चाचा दबाव आणि अलीकडील नियामक आवश्यकतांमुळे वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

५) Tata Motors: कंपनीने ऑफर केलेल्या ICE आणि EVs या दोन्ही मॉडेल्सच्या किमतीत वाढ होईल.

६) Kia India: किआ कंपनीची वाहने जानेवारी २०२३ पासून ५०,००० रुपयांपर्यंत महाग होतील.

(हे ही वाचा : Maruti Electric Car: Tata ला टक्कर द्यायला येतेय Maruti ची पहिली स्वस्त Electric Car; जाणून घ्या कधी होणार लाँच? )

७) Mercedes-Benz: लक्झरी कार कंपनी ५ टक्क्यांपर्यंत किमती वाढवेल.

८) MG Motor: कंपनी आपल्या SUV च्या किमती ९०,००० पर्यंत वाढवेल.

९)  Audi India: कंपनी जानेवारी २०२३ पासून कारच्या किमती १.७ टक्क्यांनी वाढवणार आहे.