Popular Car: भारतीय कार बाजारात जपानी दिग्गज वाहन निर्माती कंपनी निसान कंपनीने ‘जीटी-आर’ कार लाँच केली होती. ही कार माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि इतर अनेक सेलिब्रेटींची आवडती होती. आता निसान मोटरची स्थिती फारशी चांगली नाही. निसान आगामी काळात भारतातून आपला व्यवसाय गुंडाळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. १५ वर्षांनंतर निसान जीटीआर कार आता ग्लोबल मार्केटमधून बंद केली आहे. निसानने अद्याप भारतात व्यवसाय बंद करण्याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु वेबसाइटवरुन ही कार निश्चितपणे हटवली आहे. आता निसान इंडियाच्या वेबसाइटवर निसान किक्स आणि निसान मॅग्नाइट या दोनच गाड्या सूचीबद्ध आहेत.

निसान GT-R ची निर्मिती २००७ पासून सुरु होती, आणि १५ वर्षात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सचिन तेंडुलकर आणि जॉन अब्राहम यांच्यासह भारतातील अनेक सेलिब्रिटी निसान GT-R चे मालक आहेत. आता ही कार अनेक जागतिक बाजारपेठेत बंद झाली आहे.

(आणखी वाचा : Auto Expo 2023: बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतेय Hyundai Creta CNG; मारुतीच्या ग्रँड विटारा, हायरायडरला देणार टक्कर)

निसानने काही दिवसांपूर्वीच आपल्या तीन नवीन गाड्यांचे प्रदर्शन करुन अशा सर्व अटकळांना खोडून काढले, अगदी काहीही न बोलता. Nissan ने त्यांचे तीन जागतिक मॉडेल – Nissan Juke, Nissan Qashqai आणि Nissan X-Trail भारतात सादर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या काळात निसान अनेक कार्स लाँच करणार आहे. यापैकी MY2023 Nissan GT-R कार आधीच सादर करण्यात आली आहे. जी सर्वात आधी अधिकृतपणे लाँच केली जाईल. हे ग्लोबल लाँचिंग असेल. तसेच कंपनी भारतीय बाजारात त्यांची एसयूव्ही लाँच करेल.