रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इंजिनियर्स व प्रोफेशनल्ससाठी झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये भारतातातील ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीचे आपले स्वप्न सांगितले. मिशन ग्रीन हायड्रोजन अंतर्गत भारतात १ डॉलरहून कमी दरात १ किलोग्रॅम ग्रीन हायड्रोजन उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. जर गडकरी यांचे हे स्वप्न सत्यात उतरले तर येत्या काळात भारतात पेट्रोल डिझेलचे भाव वधारले तरी वाहन चालवणे अगदी स्वस्त होऊ शकते.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलियम, बायोमास, ऑरगॅनिक कचरा, सांडपाणी यापासून ग्रीन हायड्रोजन बनवले जाते. विमान, रेल्वे तसेच कार धे सुद्धा हे ग्रीन हायड्रोजन वापरले जाऊ शकते. सध्या नितीन गडकरी वापरणारे टोयोटा मिराई ही हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. एकदा इंधनाची टाकी पूर्ण भरल्यास ही हायड्रोजन कार ६५० किमी पर्यंत प्रवास करू शकते.

गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावताय? भरावा लागेल ‘इतका’ दंड, मुंबई पोलीसांची हटके Warning बघा

हायड्रोजन कार हे एक इलेक्ट्रिक वाहन आहे मात्र चार्जिंग न करता हायड्रोजनच्या वापरावर ही कार चालते. हायड्रोजन कारला आवश्यक वीजपुरवठा हा हवेतील ऑक्सिजन व इंधनाच्या टाकीतील हायड्रोजन यांच्या केमिकल रिऍक्शनने प्राप्त होतो. जर जा यातून अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर कार मध्ये असणारं पॉवर कंट्रोल युनिट या एनर्जीला बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हायड्रोजन कार प्रमाणेच गडकरी यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या वापरावर सुद्धा भर दिला. १ लिटर पेट्रोल हे १.३ लिटर इथेनॉलच्या बरोबरीचे आहे. इथेनॉलची किंमत सुद्धा ६२ रुपये प्रति लिटर इतकी कमी आहे. कचऱ्यातून नवनिर्मितीच्या संकल्पनेला अधोरेखित करत गडकरी यांनी नागपूर मधील एका प्रकल्पाची माहिती दिली. आम्ही नागपुरात सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या प्लांट उभारला आहे, यातुन वर्षाला ३०० कोटींची कमाई होते. भारतात केवळ ओला व सुका कचरा व्यवस्थापन करण्याच्या क्षेत्रातून सुद्धा ५ लाख कोटीचे व्यवसाय तयार करण्याची क्षमता आहे असेही गडकरी यांनी सांगितले.