Cheapest 7 Seater MPV: जर तुमचे बजेट ७ लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुमचे कुटुंब मोठे असेल, तर परवडणारी MPV खरेदी करणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. MPV ही एक प्रकारची कार आहे ज्यामध्ये सात लोक बसू शकतात, जी मोठ्या SUV किंवा मिनीव्हॅनपेक्षा अधिक परवडणारी असू शकते.

भारतात, सर्वात स्वस्त MPVs पैकी एक म्हणजे Renault Triber आहे. ट्रायबरची सुरुवातीची किंमत ६.३३ लाख रुपये आहे आणि त्यात सात लोक बसण्याची क्षमता आहे. ट्रायबरमध्ये अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत जी त्यास एक मौल्यवान पर्याय बनवतात.

रेनॉल्ट ट्रायबरला किंमत आणि त्यात उपलब्ध वैशिष्ट्यांमुळे ग्रामीण ते शहरी भागात याला खूप पसंती मिळत आहे. या MPV मध्ये अनेक फीचर्स आहेत जे तुम्हाला खूप आवडतील. विशेष म्हणजे ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत देखील उत्तम आहे.

(हे ही वाचा : Royal Enfield च्या स्वस्त बाईकसमोर कोणीच टिकले नाय! खरेदीसाठी रांगा, ११ महिन्यांत २ लाखांहून अधिक विक्री)

दमदार इंजिन

या कारमध्ये कंपनीने पॉवरफुल इंजिन दिलं आहे. रेनॉ ट्रायबरमध्ये कंपनीने १.० लीटर क्षमतेचे नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं आहे जे ७१ बीएचपी पॉवर आणि ९६ न्युटन मीटर पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. Renault Triber चे मायलेज १८.६ kmpl आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्ट्ये

या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.  MPV मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. MPV ला दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी AC व्हेंट्स, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, सेंटर कन्सोलमध्ये कूल्ड स्टोरेज आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो.