टाटा मोटर्स देशातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्स नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. Auto Expo २०२३ मध्ये देखील टाटाने अनेक कार्स त्यामध्ये ईव्ही कार्सचे देखील सादरीकरण केले होते. नुकतेच टाटा मोटर्सने त्यांच्या आगामी मॉडेल २०२३ टाटा हॅरिअर एसयूव्हीसाठी बुकिंग सुरु केले आहे. नवीन अपडेटेड हॅरिअरमध्ये सेफ्टी फीचर्स आणि केबिन यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक प्रकारचे अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिचर्स

टाटा हॅरिअरच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास तर त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. गाडीच्या सीटपासून डॅशबोर्डपर्यंत सर्व काही नवीन प्रकारात देण्यात आले आहेत. यामध्ये पुढील भागात एक नवीन ७ इंचाचा पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक नवीन इनबिल्ट फंक्शन्स देखील देण्यात आले आहेत. त्यातील १२ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्मूथ आणि फास्ट आहे. यामध्ये JBl ची ९ स्पीकर ऑडिओ सिस्टीम आहे. तसेच यामध्ये रिमोट कमांड, जिओफेन्सिंग, OTA अपडेट व्हेईकल सोल्यूशन यासह नवीन सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.

2023 Tata Harrier – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

हेही वाचा : RBI कडून ‘इतक्या’ अ‍ॅग्रीगेटर्सना Online Payment साठी काम करण्याची तत्वतः परवानगी, जाणून घ्या कोणाकोणाचा आहे समावेश

कसा आहे लुक

टाटा मोटर्सने हॅरिअरच्या सध्याच्या डिझाईनमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत . ज्यामध्ये १७ इंचाचा डायमंड-कट अलॉय व्हील, झेनॉन एचआयडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, 3D LED टेललॅम्प हे फिचर आहेत. २०२३ टाटा हॅरिअर ला लेव्हल 2 ADAS सिस्टीम देखील वापरकर्त्यांना मिळणार आहे. ज्यामध्ये collision warning, automatic emergency braking, traffic sign recognition, high-beam assist, land departure warning, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज अलर्ट आणि rear collision alert असा महत्वाच्या फीचर्सचा समावेश आहे.

देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने २०२३ Tata Harrier चे बुकिंग ग्राहकांसाठी सुरु केले आहे. ग्राहक ऑनलाईन किंवा अधिकृत डिलरकडे जाऊन हॅरिअरचे बुकिंग करू शकणार आहेत. तुम्हाला या गाडीच्या बुकिंगसाठी ३०,००० रुपये इतके डाऊन पेमेंट करावे लागणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors started bookings for its 2023 tata harrier suv tmb 01
First published on: 17-02-2023 at 10:10 IST