Best Selling SUV In April 2023: भारतातील SUV सेगमेंट अतिशय वेगाने वाढत आहे. यामध्येही, विशेषत: सब-४ मीटर एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीची अधिक विक्री होते. एप्रिल महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ही सब-4 मीटर एसयूव्ही विभागातील आहे. जवळपास दर महिन्याला या विभागातील एक किंवा दुसरी कार सर्वाधिक विक्री होणारी SUV बनते. टाटा नेक्सॉन ही एप्रिल महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वाधिक विक्री होणारी SUV

टाटा नेक्सॉन ही देशातली बेस्ट सेलिंग एसयूव्ही ठरली आहे. एप्रिल २०२३ मध्ये, टाटाने नेक्सॉनच्या १५,००२ युनिट्सची विक्री केली आहे जी गेल्या वर्षी (एप्रिल २०२२) याच कालावधीत १३,४७१ युनिट्सची विक्री झाली होती. तर मार्च २०२३ मध्ये टाटा नेक्सॉनच्या १४,७६९ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच महिना-दर-महिना आधारावर पहा किंवा वर्ष-दर-वर्ष आधारावर पहा, दोन्ही बाबतीत टाटा नेक्सॉनची विक्री वाढली आहे. यासह, ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली.

(हे ही वाचा : आपल्याच Kia Seltos चा खेळ खल्लास करणार ‘ही’ नव्या अवतारात देशात दाखल झालेली कार, फीचर्सही तगडे, किंमत…)

दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV

दुसरीकडे, मार्च महिन्यात (२०२३) सर्वाधिक विक्री होणारी SUV मारुती ब्रेझा एप्रिल महिन्यात दोन स्थानांनी घसरून तिसर्‍या क्रमांकावर आली आणि तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली. या दोघांमध्ये, Hyundai Creta ने जागा घेतली आणि दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली. एप्रिल २०२३ मध्ये क्रेटाच्या १४,१८६ युनिट्सची विक्री झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये १२,६५१ युनिट्स आणि मार्च २०२३ मध्ये १४,०२६ युनिट्सची विक्री झाली.

तीसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV

एप्रिल २०२३ मध्ये ११,८३६ युनिट्सची विक्री होऊन मारुती ब्रेझा तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. महिन्या-दर-महिन्यानुसार त्याच्या विक्रीत घट झाली आहे. मार्च महिन्यात (२०२३) १६,२२७ युनिट्सची विक्री झाली आहे. तथापि, एप्रिल २०२२ मध्ये ११,७६४ युनिट्सची विक्री होऊन वार्षिक आधारावर विक्रीत फारच थोडी वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata nexon was the best selling suv in the month of april tata nexon has sold 15002 units in april 2023 pdb
First published on: 11-05-2023 at 10:21 IST