2023 Hero Passion Plus 100cc Launch Soon: Hero Motorcorp ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी दुचाकी कंपन्यांपैकी एक आहे. दर महिन्याला या कंपनीच्या लाखो बाईक्स भारतात खरेदी केल्या जातात. हिरोची परवडणारी कम्युटर मोटरसायकल सर्वाधिक विकली जाते. हिरो स्प्लेंडर, हिरो एचएफ डिलक्स आणि हिरो पॅशन ही यातील काही लोकप्रिय नावे आहेत. काही वेळापूर्वी, Honda ने स्प्लेंडरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन 100cc शाईन बाईक (Honda Shine 100) लाँच केली होती. आता या बाईकला टक्कर देण्यासाठी Hero आणखी 100cc बाईक लाँच करणार असल्याची माहिती आहे.
Hero Motorcorp देशात आणतेय ‘ही’ बाईक
Hero Motorcorp च्या बाईकचे नाव ‘हिरो पॅशन प्लस’ असे नाव असेल. हिरो पॅशन प्लस नावाच्या आधीही एक बाईक विकली गेली होती, जी २०१९ मध्ये बंद करण्यात आली होती. सध्या बाजारात हिरो पॅशन आणि हिरो पॅशन प्रो नावाच्या ११०cc बाईक्स विकल्या जात आहेत. नवीन Hero Passion Plus लाँच केल्यानंतर, ग्राहकांना बाजारात आणखी 100cc परवडणारा पर्याय जोडला जाईल. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, बाईक डीलरशिपपर्यंत पोहोचू लागली आहे. यासह, हिरोकडे आता 100cc सेगमेंटमध्ये एकूण ३ मॉडेल्स असतील, ज्यात Hero HF Deluxe आणि Hero Splendor Plus यांचा समावेश आहे. मात्र, पॅशन प्लसमध्ये ग्राहकांना इतर दोन बाईकपेक्षा चांगले स्टायलिंग आणि फीचर्स मिळू शकतात.
(हे ही वाचा : TVS Jupiter, Suzuki Access ची उडाली झोप! देशात खप खप खपली ७५ हजाराची स्कूटर, एका लिटरमध्ये धावते ५५ किमी)
हिरो पॅशन प्लसची वैशिष्ट्ये
हिरो पॅशन प्लस हीरोच्या प्रॅक्टिकल लाइनचा नवीन फ्लॅगशिप असण्याची शक्यता आहे. पॅशन प्लस स्प्लेंडर प्रमाणेच ९७.२cc इंजिनद्वारे समर्थित असेल, जे ७.९१ bhp आणि ८.०५ Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ४-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. इंस्ट्रुमेंटेशन आणि वैशिष्ट्यांची यादी मानक पॅशन ११० सारखीच असण्याची शक्यता आहे. यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्क्वेरिश एलसीडी डिस्प्ले आणि मोबाइल चार्जिंग पोर्टसह अॅनालॉग स्पीडोमीटर असेल. हा डिस्प्ले ओडोमीटर रीडिंग, ट्रिप मीटर, इंधन गेज आणि बरेच काही दर्शवेल.
हिरोचे i3S स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञानही यामध्ये देण्यात येणार आहे. इंधनाची इकॉनाॅमी हीरो पॅशन प्लस सारखीच असण्याची शक्यता आहे. अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही परंतु ते 60+ kmpl चे मायलेज देऊ शकते.
किंमत किती असेल?
2023 Hero Passion Plus 100cc च्या किमती अजून उघड झालेल्या नाहीत. या बाईकचे बुकिंग सुरू झाले असल्याची माहिती आहे.