स्वतःची चारचाकी गाडी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. दसरा, दिवाळी अशा सणांच्या शुभमुहूर्तावर बरेच जण नवीन गाडी विकत घेतात. तुम्हीदेखील येणाऱ्या दिवसांमध्ये गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बरेच नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. कारण पुढील काही महिन्यात भारतात अनेक नवीन कार मॉडेल्स लाँच होणार आहेत. या गाड्यांची किंमत १८ ते २० लाख रुपयांच्या रेंजमध्ये असेल. मारुती सुझूकी (Maruti Suzuki), ह्युंडाय (Hyundai), किया (Kia), सिट्रोन (Citron) या कंपन्यांचे नवीन कार मॉडेल्स लवकरच लाँच होणार आहेत. यापैकी २० लाखांपेक्षा कमी किंमतीतील कोणते नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत जाणून घ्या.

२० लाखांपेक्षा कमी किंमत असणारे आणि लवकरच लाँच होणारे नवीन कार मॉडेल्स

आणखी वाचा : लाँचआधीच मारुती सुझुकीच्या ‘या’ बहुप्रतीक्षित कारचे झाले ५० हजारांहून अधिक बुकिंग

टोयोटा हायरायडर (Toyota Hyryder)
भारतीय बाजारपेठेत या कारची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लॉंचपूर्वीच होणाऱ्या या चर्चेमुळे ग्राहकांना या कारचे फिचर्स जाणून घेण्याची उत्सुकता आहे. या कारची सुरुवातीची किंमत ९.५ लाख रुपये असू शकते.

न्यु टोयोटा अर्बन क्रूझर (New Toyota Urban Cruiser)
ही कार लेटेस्ट मारुती सुझुकी ब्रेझावर आधारित आहे. येत्या काही महिन्यामध्ये ही कार लाँच होणार आहे. कारच्या इंटीरियर आणि एक्सटीरियरमध्ये बरेच बदल पाहायला मिळतील. ही कारमध्ये १.५ लीटर K१५C सौम्य हायब्रिड पेट्रोल इंजिन सुविधा उपलब्ध असेल.

मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara)
या यादीतील ही बहुप्रतिक्षित कार आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ९.३५ लाख ते १९ लाख रुपये असू शकते. या कारचे अनेक फीचर्स टोयोटा अर्बन क्रुझरप्रमाणे असतील.

नेक्स्ट जेन ह्युंडाय वेर्ना (Next-gen Hyundai Verna)
पुढील वर्षी ही कार भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. कारच्या एक्स्टिरियरमध्ये अनेक बदल असण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर इंटिरिअरमध्येही अनेक नवीन फिचर्स जोडण्यात येणार आहेत.

आणखी वाचा : ७० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत ‘या’ आकर्षक स्कूटर; पाहा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्युंडाय क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift)
क्रेटा ही सध्या ह्युंडाय कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे. या कारचा फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून वापरला जात आहे. ही कार अनेक नवीन आकर्षक फीचर्ससह लवकरच लाँच होणार आहे.