Toyota Camry: जपानी कार निर्माता कंपनी टोयोटाने आज अधिकृतपणे त्यांच्या प्रसिद्ध लक्झरी सेडान कार टोयोटा कॅमरीचे नवव्या जनरेशनचे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केले आहे. कंपनीने नवीन टोयोटा कॅमरी ४८ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. ही कार सुमारे एक वर्षापूर्वी जागतिक बाजारपेठेत लाँच झाली होती, आता ती भारतीय बाजारपेठेत पोहोचली आहे. कंपनीने या कारमध्ये लेटेस्ट जनरेशन हायब्रीड तंत्रज्ञान वापरले आहे.

पहिल्यापेक्षा महागली कॅमरी

टोयोटा कॅमरीच्या मागील जनरेशनच्या मॉडेलच्या तुलनेत, नवीन कारची किंमत अंदाजे १.८३ लाख रुपयांनी महागली आहे. मागील मॉडेलची सुरुवातीची किंमत ४६.१७ लाख रुपये होती. बाजारात ही कार Skoda Superb सारख्या कारशी स्पर्धा करते, ज्याची किंमत ५४ लाख रुपयांपासून सुरू होते. लक्झरी सेडान सेगमेंटमध्ये ही कार तिच्या लूक-डिझाइन आणि आरामदायी राइड आणि अॅडव्हॉन्स फीचर्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

कशी आहे नवीन टोयोटा कॅमरी

टोयोटा कॅमरी TNGA-K प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे, ज्यामुळे ही कार गुरुत्वाकर्षण केंद्र आणि सीटिंग पोजिशन कमी करून आरामदायी राइड प्रदान करते. कंपनीने या कारचा लूक आणि डिझाइन खूप रिफ्रेश केला आहे. कारच्या समोरच्या भागात टोयोटा स्पोर्ट्स “हॅमरहेड” स्टाइल, एक धारदार नाक, स्लिम एलईडी हेडलॅम्प आणि U-आकाराचे डे-टाइम रनिंग लाइट्स दिले आहेत.

हेही वाचा… महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

याव्यतिरिक्त, एक पातळ लोखंडी जाळी हेडलाइट्सशी जोडते, ‘T’ लोगो मागील मॉडेलपेक्षा थोडा वर हलविला आहे. साइड प्रोफाईलबद्दल बोलायचे झाल्यास, एक बोल्ड नवीन कॅरेक्टर लाइन, नवीन डिझाइन केलेले १८-इंच अलॉय आणि नवीन ‘C’ आकाराचे LED टेल लॅम्प डिझाइन्स आहेत.

विलक्षण केबिन

एक्सटीरियरप्रमाणेच कंपनीने या कारचे इंटीरियरदेखील अतिशय आलिशान बनवले आहे. यामध्ये पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे, ज्यामध्ये ७-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंटसाठी १२.३ इंचाचा टचस्क्रीन देण्यात आली आहे, जे वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी प्रदान करते. यात नऊ-स्पीकर JBL साउंड सिस्टम, १०-इंच हेड-अप डिस्प्ले आणि डिजिटलची कार्यक्षमतादेखील आहे.

हेही वाचा… या वर्षातील सर्वात मोठी ऑफर! मारुतीपासून ते महिंद्रापर्यंत कंपन्या देतायत भरघोस सूट, नवीन कार खरेदीवर होईल लाखोंची बचत

गाडीच्या मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांच्या आरामाचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मागील सीट्समध्ये रेक्लिनिंग आणि वेंटिलेशन फंक्शन्स आणि रियर सेंटर कन्सोलमध्ये कंट्रोल सिस्टम दिली आहे. अतिरिक्त सोईसाठी कंपनीने हीटेड (गरम करणारे) आणि वेंटिलेटेड फ्रंट सीटदेखील दिल्या आहेत.

पॉवर आणि परफॉर्मन्स

टोयोटाने या कारच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. नवीन कॅमरीमध्ये २.५ लिटर पेट्रोल आहे, जे कंपनीने पाचव्या जनरेशन हायब्रिड सिस्टम (THS 5) ने सुसज्ज केले आहे. तथापि, कंपनीचे म्हणणे आहे की या इंजिनचे पॉवर आउटपूट अंदाजे चार टक्क्यांनी वाढले आहे. हे इंजिन 230hp पॉवर जनरेट करते. याशिवाय कंपनीचा दावा आहे की, कारच्या मायलेजमध्येदेखील सुमारे ३० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. मात्र, कंपनीने कोणतीही आकडेवारी शेअर केलेली नाही. हे इंजिन eCVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेफ्टी फीचर्स

टोयोटा कॅमरीमधील सेफ्टी फीचर्समध्ये प्री-कोलाइजन सिस्टम, पॅडेस्ट्रियन डिक्टेशन, रडार-बेस्ड क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि रोड साइन असिस्ट यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे ही कार नऊ एअरबॅग्सने सुसज्ज आहे, जी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्यात मदत करते. याशिवाय या कारमध्ये पार्किंग सेन्सर आणि 360-डिग्री कॅमेरादेखील देण्यात आला आहे.